शिल्पा शेटीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्राला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मंगळवारीच त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याच्या जामिनावर जी सुनावणी झाली त्यातही त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि पॉर्न फिल्म प्रकरणात रोज नवेनवे खुलासे होत आहेत. अशात आता क्राईम ब्रांच्या चार्जशीटमध्ये एका PPT चा म्हणजेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा उल्लेख केला आहे. एवढंच नाही तर काही whats app चॅटच्या मदतीने राज कुंद्राचा प्लान बी काय होता तेदेखील समजलं आहे.
ADVERTISEMENT
राज कुंद्राला अटक करण्याआधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) पॉर्न फिल्म प्रकरणात खोलवर तपास केला. ज्यावेळी राज कुंद्राचा साथीदार उमेश कामतला अटक झाली तेव्हा पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. या पुराव्यांच्या आधारेच एप्रिल महिन्यात चार्जशीट फाईल करण्यात आली. या चार्जशीटमध्ये पॉर्न फिल्म व्हीडिओजच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये किती कमाई होणार याची माहिती समोर आली आहे. या चार्जशीटची एक कॉपी इंडिया टुडेच्या हाती लागली आहे. जाणून घ्या ग्रॉस रेव्हेन्यू आणि प्रॉफिट बद्दल
वर्ष 2021-22
ग्रॉस रेव्हेन्यू – 36.50 कोटी
प्रॉफिट 4,76, 85000 कोटी
वर्ष 2022-23
ग्रॉस रेव्हेन्यू- 73 कोटी
प्रॉफिट 4,76, 85000 कोटी
वर्ष 2023-24
ग्रॉस रेव्हेन्यू – 1.46 अब्ज
प्रॉफिट- 30, 42, 1, 400 कोटी
मात्र ही आकडेमोड नेमकी काय आहे ते पोलिसांना समजू शकलेलं नाही. राज कुंद्राला अटक केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडून नेमकी माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज कुंद्राने माहिती दिली की पोलीस सप्लिमेंटरी चार्जशीटही दाखल करणार आहेत. याच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं आणखी एक पान पोलिसांना मिळालं आहे. ज्यामध्ये बॉलीफेम मीडिया लिमिटेड नावाच्या कंपनीचा एस्टिमेटेड रेव्हेन्यू लिहिण्यात आला आहे. मात्र हे आकडे रूपयांमध्ये नाही तर पाऊंडमध्ये लिहिण्यात आले आहेत
काय होता राज कुंद्राचा प्लान बी?
राज कुंद्राच्या What’s App चॅटमधूनही काही गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास आहे तो बॉलिफेम App चा उल्लेख. जेव्हा गुगल आणि अॅपल या दोघांनीही HotShot हे अॅप हटवलं तेव्हा राज कुंद्रा बॉलिफेम App आणणार होता. हा त्याचा प्लान बी होता. फेब्रुवारी 2021 मध्ये जेव्हा पॉर्नोग्राफी रॅकेटचं पितळ उघडं पडलं तेव्हा राज कुंद्राने प्लान बी अॅक्टिव्हेट केला. त्यानंतर त्याने त्याचा फोनही बदलला. मुंबई पोलिसांनी जेव्हा राज कुंद्राकडे त्याचा जुना मोबाईल मागितला तेव्हा राज कुंद्राने सांगितलं की हा नवा फोनच माझ्याकडे आहे जुना फोन नाही. पोलिसांसाठी राज कुंद्राचा जुना फोन मिळणं आवश्यक आहे कारण पॉर्न रॅकेट कसं चालत होतं त्याचे सगळे डिटेल्स त्या फोनमध्ये असतील असा विश्वास मुंबई पोलिसांना आहे. त्या फोनमध्ये असलेल्या चॅट्सद्वारे, फोटो, व्हीडिओज आणि कॉल रेकॉर्डद्वारेही पॉर्न फिल्म बाबत बरीच माहिती मिळू शकते.
HotShot Content बाबत माहित होतं का? शिल्पा शेट्टी म्हणते..
इंडिया टुडेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राने एक नवं अॅप सुरू केलं होतं. या अॅपद्वारे चांगला व्यवसायही होत होता. नफाही चांगला होत होता त्यामुळे त्याला हेच अॅप कंटीन्यू करायचं होतं. दुसऱ्या आरोपींच्या मदतीने पोलीस जोपर्यंत राज कुंद्रापर्यंत पोहचले तोपर्यंत राज कुंद्राने आपल्या सुरक्षिततेची सगळी व्यवस्था केली होती. जेव्हा मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या अंधेरी या ठिकाणी असलेल्या ऑफिसवर छापा मारला तेव्हा त्यांना कळलं की बराचसा डेटा डिलिट करण्यात आला आहे. त्या ऑफिसमध्ये असलेल्या सर्व्हरचा अॅक्सेस एक-दोघांकडेच होता. हा डेटा राज कुंद्रा आणि त्याचा टेक्निकल हेड रायन थॉर्प यांच्यापैकी एकाने डिलिट केला असणार असा संशय पोलिसांना आहे. हा डेटा आता रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
ADVERTISEMENT