Bappi Lahiri death & Obstructive Sleep Apnea: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतल्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या क्रिटिकेअर रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांचं निधन झालं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बप्पी लहरी यांना Obstructive Sleep Apnea या आजाराने ग्रासलं होतं. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया हा आजार म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत? त्याचे उपचार काय? जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणजे काय?
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया हा एक झोपेशी संबंधित आजार आहे. हा आजार श्वासाशी संबंधित आहे. या आजारात झोपेत श्वास थांबतो आणि सुरू होतो. श्वासोश्वास थांबल्याचं ज्या व्यक्तीला आजार जडला आहे त्याला समजत नाही. श्वास थांबणं हे काही सेकंदांपासून साधारण एक मिनिटापर्यंत असतं. या आजारामुळे रक्तातला ऑक्सिजन कमी होऊ लागतो. तसंच कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढू लागतं. यामुळे माणसाचा मेंदू काही सेकंदासाठी जास्त सक्रिय होतो. सक्रिय होऊन तो श्वासमार्ग उघडमण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे प्रमाण इतकं कमी असतं की माणसाला ते लक्षातही राहात नाही.
ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांना अनेकदा जाग येते. हा आजार जडलेल्या लोकांनी जर दीर्घ श्वास घेतला तर सगळं व्यवस्थित होतं. हा आजार जडलेल्यांना रात्री पाच ते तीस वेळा होऊ शकतं. ज्यांना हा आजार जडलेला असतो त्यांना झोप नीट लागत नाही. तसंच अशा लोकांना झोप नीट न झाल्याने आळस आलेला असतो. या लोकांना कळतही नाही की आपली झोप नीट झालेली नाही.
स्लीप एपनियाचे काही प्रकार असतात. यामध्ये सर्वात कॉमन आहे तो ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया असतो. हा आजार तेव्हा जडतो जेव्हा गळ्याच्या मांसपेशी गळ्याच्या दरम्यान ढिल्या पडतात. तसंच एअर फ्लोही थांबतो. तसंच हा आजार जडलेला रूग्ण जोरजोरात घोरतो. मात्र याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक घोरणाऱ्या माणसाला हा आजार झालेला असू शकतो. हा आजार ज्यांना जडला आहे त्या रूग्णांच्या श्वास नलिकेच्या वरच्या भागात ऑक्सिजन पुरेसा पोहचत नाही असंही घडू शकतं. श्वास घ्यायला अडथळे आल्याने रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. याचं प्रमाण वाढलं तर रूग्णाचा मृत्यू होतो.
obstructive sleep apnea या आजाराची लक्षणं काय आहेत?
दिवसा खूप झोप येणं
हा आजार जडलेला व्यक्ती जोरजोरात घोरतो
झोपल्यावर श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं जाणवणं
दम लागणं, अस्वस्थ वाटणं आणि झोपेतून अचानक जाग येणं
घसा कोरडा पडणं, घशात खवखव जाणवणं
सकाळी झोपेतून उठल्यावरही डोकं जड आहे असं वाटणं
ध्यान करायला अडचण येणं
सतत बदलता मूड आणि डिप्रेशन
उच्च रक्तदाब
ही या आजाराची काही लक्षणं आहेत. बप्पी लहरी यांना याच आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मुंबईतल्या रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. स्लीप एपनिया हा आजार कुणालाही होऊ शकतो. मात्र काही कारणं अशी आहेत ज्यामुळे हा आजार जडण्याचा धोका वाढतो.
सगळ्यात पहिलं कारण आहे वजन जास्त असणं आणि जाडेपणा- ऑब्स्ट्रक्विट स्लीप एपनियाच धोका सर्वाधिक त्या लोकांना असतो जे खूप जाड असतात आणि त्यांचं वजनही जास्त असतं. अशा लोकांच्या श्वास नलिकेच्या वरच्या भागात फॅट्स जमा होतात. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो.
वयाची 60 वर्षे ओलांडून गेल्यानंतरही जे लोक जाडे किंवा जास्त वजन असलेले असतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया याच आजाराने बप्पी लहरींना ग्रासलं होतं. त्यावरच उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT