Mumbai Lockdown: मुंबईत कठोर लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद

मुंबई तक

• 04:10 AM • 15 Apr 2021

मुंबई: राज्यातील वाढती कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. यावेळी मुंबईत (Mumbai) झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने सरकारने येथील रुग्णसंख्या वेळीच आटोक्यात आणण्यासाठी आता अत्यंत कठोर नियम लागू केले आहेत. पण लॉकडाऊन असलं तरीही काही गोष्टी मात्र सुरु असणार आहेत. जाणून घ्या मुंबईत काय सुरु आणि काय बंद […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मुंबई: राज्यातील वाढती कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. यावेळी मुंबईत (Mumbai) झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने सरकारने येथील रुग्णसंख्या वेळीच आटोक्यात आणण्यासाठी आता अत्यंत कठोर नियम लागू केले आहेत. पण लॉकडाऊन असलं तरीही काही गोष्टी मात्र सुरु असणार आहेत. जाणून घ्या मुंबईत काय सुरु आणि काय बंद असेल.

हे वाचलं का?

पाहा मुंबईत काय सुरु असेल:

  • लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आलेली आस्थापने ही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरु राहतील. वैद्यकीय सेवांशी संबंधित गोष्टी याला अपवाद असतील.

  • हॉस्पिटल, डायग्नोस्टिक, सेंटर, लसीकरण केंद्र, मेडीकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मा कंपनी आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित इतर गोष्टी या पूर्णपणे सुरु राहतील.

  • पशुवैद्यकीय सेवा / पशु-देखभाल निवारा आणि पाळीव प्राण्यांसाठींची खाद्य दुकानं सुरु

  • किराणा सामान, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने सुरु राहतील

  • शीतगृह आणि वेअर हाऊस सेवा

  • सार्वजनिक वाहतूक: विमान, ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस (रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवाशांना मुभा, टॅक्सीमध्ये चालक आणि 50 टक्के प्रवासी, बसमध्ये जेवढे प्रवासी बसू शकतात तेवढ्यांनाच परवानगी)

15 दिवसांचा Lockdown नाही, महाराष्ट्राला 200 दिवसांच्या लसीकरणाची गरज

  • विविध देशांचे दूतावास आणि त्यांच्याशी संबंधित सेवा सुरु राहतील

  • स्थानिक अधिकाऱ्यांद्वारे सर्व सार्वजनिक सेवा

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेवा आरबीआयने नियुक्त केलेल्या सर्व सार्वजनिक सेवा

  • सेबी कार्यालयं सुरु राहतील

  • टेलिकॉम सेवा आणि त्यासंबंधी कंपन्या सुरु राहतील

  • सर्व मालवाहू सेवा आणि माल वाहतूक सुरु राहील

  • पाणीपुरवठा सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु राहील

  • शेतीविषयक निगडीत सेवा आणि कंपन्या

  • आयात-निर्यात संबंधित कार्यालये सुरु असतील

  • ई-कॉमर्स (फक्त अत्यावश्यक वस्तू आणि सेवा) सुरु राहील

  • अधिस्विकृतीधारक मीडियाला परवानगी असेल

Corona Curfew ची नियमावली काय? DGP संजय पांडेंनी दिलं उत्तर

  • पेट्रोल पंप सुरु राहतील

  • डेटा सेंटर, क्लाउड सेवा, आयटी सेवा

  • शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवांना परवानगी

  • इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा सेवा सुरु राहील

  • एटीएम सुरु असतील

  • पोस्ट सेवा सुरु राहील

  • बंदरं आणि त्याच्याशी संबंधित सेवा सुरु असतील.

  • कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल / पॅकेजिंग सुरु राहील

  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा

  • परवानाधारक व्यक्तीस दारुची होम डिलिव्हरी करण्यास मुभा (सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत)

  • पुढील कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

  • केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये सुरु राहतील

  • सर्व बँका दिलेल्या वेळेनुसार सुरु असतील.

  • नॉन बँकिंग वित्तीय सेवा

  • आवश्यक सेवांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्मिती करणारे सर्व युनिट पूर्ण क्षमतेसह कार्यरत राहतील.

  • रस्ताच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी फक्त पार्सल स्वरुपात

  • वृत्तपत्र विक्रीस परवानगी

  • लग्न समारंभासाठी फक्त 25 जणांना परवानगी असेल.

  • अत्यसंस्कारासाठी 20 जणांना उपस्थित राहता येईल

  • सर्व बांधकामं सुरु राहतील.

कोरोना, काळजी आणि लसीकरण तुमच्या मनातल्या प्रश्नांना डॉ. रवि गोडसेंनी दिली आहेत उत्तरं

मुंबईत काय-काय बंद राहणार?

  • कलम 144 लागू करण्यात आलं असून संचारबंदी लागू असेल

  • नागरिकांना कोणत्याही अधिकृत कारणाशिवाय सार्वजनिक स्थळी फिरता येणार नाही

  • सर्व बार आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद राहतील. फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी असेल. हॉटेलमधील बार आणि रेस्टॉरंट हे इन-हाऊस गेस्टसाठी सुरु राहतील.

  • मॉल पूर्णपणे बंद राहतील, फक्त येथे असणाऱ्या अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु राहतील

  • सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील.

  • जिम, स्विमिंगपूल आणि अम्युझमेंट पार्क, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स बंद राहतील.

  • सिनेमा, मालिका आणि जाहिरातींचं शूटिंग बंद राहील

  • बीच, गार्डन, खेळाची मैदानं बंद राहतील

  • सर्व धार्मिक स्थळं बंद राहतील फक्त नित्य पूजा-विधीस परवानगी असेल

  • सलून, स्पा आणि ब्यूटी पार्लर बंद राहतील

  • शाळा आणि कॉलेज बंद राहतील.

  • धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि सभांना बंदी असेल

  • एखाद्या इमारतीत 5 हून अधिक जण पॉझिटिव्ह आढळून आल्यास मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात येईल.

    follow whatsapp