औरंगाबाद: ‘समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते.’ असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असा आक्षेप आतापर्यंत अनेक राजकीय संघटना किंवा पक्षांनी घेतले आहेत. मात्र, आता याचबाबत राज्यपालांनी वक्तव्य केल्याने याबाबत आता नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचं सांगितांना त्यांनी समर्थ हेच शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
‘आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते… चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे.’ असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
‘संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि व्होटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे.’ असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या याच वक्तव्याबाबत नेमक्या काय प्रतिक्रिया येतात याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. काही कादंबऱ्यांमध्ये समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचं म्हटलं आहे. मात्र, काही इतिहास तज्ज्ञांच्या मते समर्थ रामदास स्वामी हे शिवाजींचे गुरु नव्हते. याबाबत काहीसा वाद सतत सुरु असतो.
शिवजयंती विशेष: समुद्र, आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराज!
‘मुकाबला बरोबरीत हवा…’
‘मोठा असलेला लहानावर हल्ला करतो हे बरोबर नाही.’ असं म्हणत भागतसिंह कोश्यारी यांनी रशिया आणि युक्रेनबाबत अप्रत्यक्षरिता विधान केलं आहे.
‘मुकाबला बरोबरीच्या लोकांसोबत व्हावा. त्यावेळी त्यात दुराचार नसावा, रावण शक्तिशाली होता, त्याच्याकडे सत्ता, संपत्ती होती, तो विद्वान होता. देवांचे देव इंद्र देखील त्याच्या पुढे कोणी नव्हता. मात्र, त्याच्या मनात दुराचार आल्याने रामासारख्या साधारण व्यक्तीकडून तो पराभूत झाला. असंही यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT