शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकणारी सगळी खेळी एकनाथ शिंदेंनी रचली तरी कधी?

मुंबई तक

• 03:19 PM • 21 Jun 2022

मुंबई: विधान परिषद निवडणुकीतील धक्कादायक निकाल पचनी पडत नाही तोच आज (21 जून) पहाटेच शिवसेनेवर मोठा बॉम्ब पडला. तो म्हणजे. शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सूरत गाठून शिवसेनेच्या नेतृत्वाला खिंडीत गाठलं. पण ही सगळी खेळी झाली कधी? आणि कालच्या दिवसात नेमकं काय घडलं हेच आत आम्ही आपल्याला सांगणार आहोत क्रोनोलॉजी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: विधान परिषद निवडणुकीतील धक्कादायक निकाल पचनी पडत नाही तोच आज (21 जून) पहाटेच शिवसेनेवर मोठा बॉम्ब पडला. तो म्हणजे. शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सूरत गाठून शिवसेनेच्या नेतृत्वाला खिंडीत गाठलं. पण ही सगळी खेळी झाली कधी? आणि कालच्या दिवसात नेमकं काय घडलं हेच आत आम्ही आपल्याला सांगणार आहोत

हे वाचलं का?

क्रोनोलॉजी समझिये!

  • 20 जून 2022 (सकाळी 8.45): एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह पवईतील वेस्ट इन हॉटेलमधून विधानभवनाकडे निघाले. तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार होते.

  • 20 जून 2022 (सकाळी 9.30): शिवसेनेचे सर्व आमदार हे बसने विधानभवनाकडे निघाले. यावेळी स्वत: आदित्य ठाकरे हे देखील बसमध्ये होते. पण एकनाथ शिंदे हे आपल्या गाडीने विधानभवनाकडे गेले. यानंतर पुन्हा एकदा आमदारांच्या ताफ्यासह एकनाथ शिंदे हे मतदानासाठी विधानभवनात पोहचले.

  • 20 जून 2022 (दुपारी 2.00): मतदानाचा हक्क बजावल्यानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनाच्या बाहेर आले यावेळी त्यांनी मीडियासमोर एका शब्दानेही आपली प्रतिक्रिया दिली नाही. विधानभवनातून एकनाथ शिंदे थेट बाहेर पडले. ज्यानंतर ते पुन्हा मुंबईत दिसलेच नाही.

  • 21 जून 2022 (सकाळी 7.00): अचानक सकाळी खळबळजनक माहिती समोर आली की, एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह थेट सूरतला पोहचले आहेत.

या सगळ्या घडामोडीचे संकेत हे आदल्या दिवशी म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशी दिसून आला. महाविकास आघाडीच्या दृष्टीने विधान परिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे पूर्णपणे अलिप्त दिसून आले. या पूर्ण दिवसात शिंदेंनी फार कोणाशी चर्चाच केली नाही. त्यांचं मौन हे त्यांच्या मनातील खदखद असल्याचं आता समोर आलं आहे.

मात्र, या सगळ्यात पडद्यामागून बऱ्याच घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे हे मीडियासमोर शांत होते पण आपल्या समर्थक आमदारांची जुळवाजुळव करुन ते आपला खुंटा मजबूत करण्यात व्यस्त होते.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनाच म्हणाले… माझ्याकडे 35 आमदार, विचार करा आणि मला काय ते सांगा!

या सगळ्या पडद्यामागच्या घडामोडींचा लवलेशही कुणाला लागू नये यासाठी एकनाथ शिंदे हे प्रचंड अलर्ट होते. सूत्रांच्या माहितीनुसार या सगळ्यात भाजपची देखील त्यांना साथ होती. त्यामुळेच आपल्या समर्थक आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी थेट भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये पोहचले. यानंतर गुजरात पोलिसांनी एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेल बाहेर प्रचंड सुरक्षा तैनात केली.

या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रात मात्र मोठा भूकंप झाला आणि त्याचं केंद्र होतं सूरत.

    follow whatsapp