देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुका कधी होणार? यावर स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले..

मुंबई तक

• 06:09 AM • 26 Oct 2022

महाराष्ट्रात दिवाळीनंतर महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता निवडणुका कधी लागतील ते इश्वरालाच ठाऊक असं उत्तर दिवाळीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ऑफ द रेकॉर्ड दिलं होतं. त्याबाबत आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी याबाबत थेट उत्तर दिलं आहे. महापालिका निवडणुकांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? मुंबई […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवाळीनंतर महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता निवडणुका कधी लागतील ते इश्वरालाच ठाऊक असं उत्तर दिवाळीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ऑफ द रेकॉर्ड दिलं होतं. त्याबाबत आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी याबाबत थेट उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

महापालिका निवडणुकांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकांबाबत कोर्टात केस सुरू आहे. त्याचा केसचा जो काही निकाल लागेल किंवा कोर्टाकडून जे काही निर्देश मिळतील त्याप्रमाणे निवडणुका कधी घ्यायच्या ती तारीख ठरेल. निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाने एक वेळापत्रक ठरवलं होतं. त्याविरोधात कोर्टात केस सुरू आहे. त्याचा जो काही निकाल येईल त्यानंतर निवडणुका लागतील.

राज्याचा दौरा काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत तर काही ठिकाणी वेगळा

मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत काही ठिकाणी हा दौरा सोबत असेल तर काही ठिकाणी वेगळा असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे गटाबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रांबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोण कुठल्या प्रकारच्या बातम्या करतं आहे मला माहित नाही. मात्र निवडणूक आयोगात अशा प्रकारची प्रतिज्ञापत्रं चालत नसतात. चिन्ह कुणाला, ओळख कुणाला द्यायची त्याचे निवडणूक आयोगाचे नियम ठरलेले आहेत. गेल्या वीस वर्षात निरनिराळ्या आयुक्तांनी यासंबंधीचे दिलेले निर्णय हे प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाची प्रतिज्ञापत्रं किती आहेत? कुणाची किती रद्द झाली हे सगळं स्वतःच्या समाधानासाठी सुरू आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हे सरकार बॅनरबाजी करून पैशांची उधळपट्टी करतं आहे अशी टीका केली होती. याबाबत विचारलं असता जाऊदे हा काही उत्तर देण्यासारखा विषय नाही. मी आरोपांना महत्त्व देत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत विचारलं असता जेव्हा काही बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार ही बातमी असते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp