मुंबई: महाराष्ट्रात सत्तानाट्य रंगलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा फक्त एक भाग संपलाय. या सर्व सत्तानाट्यात चर्चेच्या केंद्रस्थान होते, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). पण, या तिन्ही नेत्यांकडे किती संपत्ती आहे? तिघांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण आहे? हे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवास एका सामान्य रिक्षाचालकापासून सुरू झाला. पण, आता ते ९ कोटींचे मालक आहेत. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री शिंदेंकडे १७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता, तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे १ कोटी १३ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये बँक ठेवी, शेअर्स, दागदागिन्यांचा समावेश आहे. तर एकनाथ शिंदेंकडे ४ कोटी ४७ लाख, तर पत्नी लता शिंदे ४ कोटी ९८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
एकनाथ शिंदे
यांच्याकडे १७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता, तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे १ कोटी १३ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये ७ बँक ठेवी, शेअर्स, दागदागिन्यांचा समावेश आहे.
स्थावर मालमत्ता
एकूण ४ कोटी ४७ लाख
पत्नी लता शिंदे ४ कोटी ९८ लाख
माजी मुख्यमंत्री उद्धव यांचा विचार केला तर ते जवळपास १४२ कोटींचे मालक आहेत. त्यांनी २०२० मध्ये विधान परिषदेच्या आमदारकीसाठी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, उद्धव यांच्याकडे २४ कोटी १४ लाख, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे ३६ कोटी १६ लाख, त्यांच्या कुटुंबाकडे १ कोटी ५८ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये शेअर्स, सोनं, बँक ठेवींचा समावेश आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्याकडे कुठलंही वाहन नाही. इतकंच नाहीतर उद्धव यांच्याकडे ५२ कोटी ४४ लाख, रश्मी यांच्याकडे २८ कोटी ९२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये त्यांचं राहतं घर, तसेच काही शेतजमीनीचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे
जंगम मालमत्ता –
उद्धव – २४ कोटी १४ लाख ९९ हजार
रश्मी – ३६ कोटी १६ लाख ४३ हजार
कुटुंब – १ कोटी ५८ लाख
यामध्ये उद्धव यांच्याकडे २३ लाख रुपयांचं सोन, तर पत्नी रश्मी यांच्याकडे १ कोटी ३५ लाख रुपयांचं सोनं, तर कुटुंबाकडे ५३ लाख ४८ हजार रुपयांचं सोनं आहे.
विशेष म्हणजे उद्धव यांच्याकडे कुठलीही गाडी नाही.
पोस्टल सेव्हींग –
उद्धव ठाकरे ३ लाख
रश्मी ठाकरे- ३ लाख
शेअर्स – २१ कोटी ६८ लाख
रश्मी ठाकरे – ३३ कोटी ७९ लाख
कुटुंब २९ लाख ५८ हजार
बँक बॅलेन्स –
१ कोटी ६० लाख
रश्मी – ३४ लाख ८६ हजार
कुटुंब – ५६ लाख
रोख रक्कम –
७६ हजार ९२२
रश्मी – ८९ हजार
कुटुंब ३९ हजार
स्थावर मालमत्ता –
५२ कोटी ४४ लाख
रश्मी – २८ कोटी ९२ लाख
यामध्ये त्यांचं राहतं घर, भूखंडाचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती श्रीमंत आहेत? तर फडणवीस देखील जवळपास ८ कोटींचे मालक आहेत. त्यांनी २०१९ मध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, देवेंद्र यांच्याकडे ४५ लाख ९४ हजार, अमृता यांची ३ कोटी ३९ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये रोख रक्कम, शेअर्स, सोनं, वाहनांचा समावेश आहे. तसेच देवेंद्र यांची ३ कोटी ७८ लाख, अमृतांची ९९ लाख ३९ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये नागपुरातील घर आणि काही शेतजमीनीचा समावेश आहे.
जंगम मालमत्ता –
देवेंद्र फडणवीस – ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपये
अमृता फडणवीस – ३ कोटी ३९ लाख ५८ हजार ७४१
रोख रक्कम –
देवेंद्र – १७५००, अमृता १२५००
बँक बॅलेन्स
देवेंद्र – ८ लाख २९ हजार ६६५
अमृता – ३ लाख ३७ हजार २५
शेअर्स –
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठलेही शेअर्स नाही.
अमृता – २ कोटी ३३ लाख ३६ हजार
पोस्टल सेव्हींग –
देवेंद्र फडणवीस- १४ लाख
अमृता फडणवीस- ५९ लाख २०००
फडणवीसांकडे ६ लाख ७ हजार रुपयांची गाडी, तर अमृतांकडे गाडी नाही.
सोनं
देवेंद्र यांच्याकडे १७ लाख रुपयांचं सोनं, तर अमृता यांच्याकडे ३४ लाख ८० हजार रुपयांचं सोनं आहे.
स्थावर मालमत्ता –
देवेंद्र – ३ कोटी ७८ लाख
अमृता – ९९ लाख ३९ हजार
यामध्ये नागपुरातील घर, काही शेतजमीनीचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस एकूण ८ कोटी ७१ लाख २१ हजार ३७५ रुपयांचे मालक आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिघांचीही तुलना केली तर उद्धव ठाकरे हे सर्वाधिक श्रीमंत आहे. तसेच २०१४ च्या तुलनेत देवेंद्र फडणवीसांच्या संपत्तीत २०१९ मध्ये वाढ झाली.
ADVERTISEMENT