कॉर्डेलिया क्रूज जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना अटक केली आहे. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. मात्र, या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. कारवाईबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत कुणाच्या बोलावण्यावरून आर्यन खान क्रूझवर गेला होता, याचा गौप्यस्फोट केला.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 3 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईबद्दल काही नवीन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर आरोप केले आहेत.
Exclusive : आर्यन खानला आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार… अशी असेल दिनचर्या
काय म्हणाले मलिक?
“एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकूण 11 लोकांना अटक केली होती. मात्र काही तासांतच त्यातील तीन लोकांना सोडून देण्यात आले. रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आलं”, असा दावा मलिक यांनी केला आहे.
“यापैकी रिषभ सचदेवा हा भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज ऊर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे. रिषभला अटक केल्यानंतर भाजपची सूत्र हलली आणि या तिघांना सोडून देण्यात आलं”, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी भाजपवर केला.
Drugs Case सुभाष घई यांनी पोस्ट केला 30 वर्षांपूर्वीचा फोटो, का होतेय इतकी चर्चा?
“एनसीबीने क्रूझवर छापेमारी केली, त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, त्यांनी आठ ते दहा लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्या रात्री 11 लोकांना अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे एक जबाबदार अधिकारी असूनही त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं”, असा दावा मलिकांनी केला आहे.
“आमीर फर्नीचरवाला व प्रतिक गाभाच्या निमंत्रणावरच आर्यन खान क्रूझवर आला होता, अशी माहिती वकील मानेशिंदे यांनी कोर्टात दिली. आता अटकेत असलेल्या लोकांच्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारावर खटला सुरू आहे. मग एनसीबीने सोडून दिलेल्या तीन मुलांचे फोन जप्त केले आहेत का? या मुलांचाही फोन तपासावा. आता हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून, याची तटस्थ समितीकडून चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची माहिती देणार आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.
‘परमबीर सिंग, वाझे जनतेचे सेवकच होते पण करत होते दुसरे धंदे’, वानखेडेंवर मलिकांचा निशाणा
“अटकेत असलेले लोक आरोपी आहेत की नाही? हे न्यायालय ठरवेल. पण अटकेचे हे पूर्ण प्रकरण कट-कारस्थान आहे. सोडलेल्या तिन्ही मुलांचे, त्यांच्या पालकांचे तसेच झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्डिंग काढावे, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र पोलिसांकडे करत आहोत. के.पी. गोसावी हा मुनमुन धमेचा आणि आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असून, त्याने कोर्टात दोन वेगवेगळे पत्ते दिले आहेत. गोसावी हा पुण्यातील फराजखाना पोलीस स्थानकात फरार आरोपी म्हणून नोंद आहे. मग आधीच आरोपी असलेल्या व्यक्तीला एनसीबीने साक्षीदार कसे केले?”, असा सवाल मलिक यांनी एनसीबीला केला आहे.
ADVERTISEMENT