राहुल गांधींना भारत जोडो यात्रा होल्डवर ठेवून गुजरातला बोलवणारे अनंत पटेल कोण?

मुंबई तक

• 11:33 AM • 24 Nov 2022

श्रेया बहुगुणा, प्रतिनिधी, न्यूज तक राहुल गांधी दोन महिन्यांहून अधिक काळ भारत जोडो यात्रेला निघाले आहेत.. त्यांच्या या यात्रेला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे.. हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुका पाहता राहुल गांधींनी या राज्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवली पाहिजे असं मत राजकीय जाणकारांनी मतही व्यक्त केलं होतं. मात्र याच दरम्यान सर्वांना आश्चर्याचा धक्का देत राहुल गांधी २१ […]

Mumbaitak
follow google news

श्रेया बहुगुणा, प्रतिनिधी, न्यूज तक

हे वाचलं का?

राहुल गांधी दोन महिन्यांहून अधिक काळ भारत जोडो यात्रेला निघाले आहेत.. त्यांच्या या यात्रेला प्रचंड जनसमर्थन मिळत आहे.. हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुका पाहता राहुल गांधींनी या राज्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवली पाहिजे असं मत राजकीय जाणकारांनी मतही व्यक्त केलं होतं. मात्र याच दरम्यान सर्वांना आश्चर्याचा धक्का देत राहुल गांधी २१ नोव्हेंबरला गुजरातच्या रॅलीत पोहोचले. काँग्रेसला या रॅलीचा फायदा आदिवासी आणि पटेल समाजात झाल्याचे बोललं जातंय. पण तुम्हाला माहित आहे का की राहुल गांधी भारत जोडो यात्रा होल्डवर ठेवून गुजरातला का पोहोचले ते? राहुल गांधी अनंत पटेल यांच्या बोलावण्यावरुन गुजरातला गेले होते. ज्यांच्या बोलण्यावर राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडून गुजरातला गेले ते अनंत पटेल कोण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

कोण आहेत अनंत पटेल?

अनंत पटेल यांची पहिली ओळख ही ट्युशन टिचर अशी दिली जाते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले पटेल हे आज आदिवासी समाजाचे मोठे नेते मानले जातात. २०१७ मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले. अनंत पटेल यांच्याबाबत समजून घ्यायचं असेल तर या गोष्टीपासून सुरुवात केली पाहिजे. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात गुजरातमधील पार-तापी आणि नर्मदा नदीला जोडून सौराष्ट्र आणि कच्छसारख्या कोरड्या भागात पाणी पोहोचवण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे या भागातील दुष्काळाची समस्या संपुष्टात येऊ शकली असती. मात्र या प्रकल्पामुळे वलसाड, डांग, तापी जिल्ह्यांतील आदिवासींना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावं लागणार असल्याने ५० हजार लोकांना थेट फटका बसला असता.

आदिवासी नेते ही अनंत पटेल यांची मुख्य ओळख

याच कारणास्तव, २५ मार्च रोजी, गुजरातच्या आदिवासींनी या रिवाक लिंक प्रकल्पाला जोरदार विरोध केला.. त्याची झळ गांधीनगरपर्यंत पोहोचली. याचा परिणाम झाला आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही योजना मागे घेण्याची घोषणा केली.. या आंदोलनाते नेते होते अनंत पटेल…. ४५ वर्षांचे पटेल, काँग्रेसचे आमदार आणि आदिवासी नेते आहेत. २०१७ मध्ये ते नवसारी जिल्ह्यातील वासंदा मतदारसंघातून १८००० हून अधिक मतांनी विजयी झाले. ५२ टक्के मत मिळवत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. नवसारी जिल्ह्यातील वासंदा ही एकमेव सीट आहे जी वलसाड लोकसभा मतदारसंघात येते.

अनंत पटेल गुजरातच्या युवा नेत्यांपैकी एक

अनंत पटेल हे गुजरात काँग्रेसच्या प्रखर युवा नेत्यांपैकी एक आहेत. हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये असताना, अनंत पटेल हार्दिक आणि जिग्नेश मेवाणी असं त्रिकूट होतं. अनंतने दक्षिण गुजरातमधील वीर नर्मदा विद्यापीठातून पीजीपर्यंतचे शिक्षण घेतलंय. त्यानंतर ते शाळेत शिकवू लागले.. घरखर्च भागवण्यासाठी ट्युशनही घेऊ लागले. पण त्यांचं ध्येय हे राजकारणात येणं हेच होतं. म्हणून २००९ मध्ये त्यांनी गाल उनाई इथून सरपंचपदाची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर हळूहळू त्यांच्या राजकारणाचा आलेख वाढत गेला..२०१७ मध्ये ते आमदार झाले.. मातीशी जोडलेले अनंत पटेल यांनी आदिवासी सत्याग्रहाचे व्यासपीठ उभे केले होते.. तेव्हा अनंत पटेल म्हणाले होते ते किंवा, काँग्रेस हे दोघेही विकासाच्या विकासाच्या विरोधात नाहीत. पण आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करून हा विकास होऊ शकत नाही’ असंही म्हणाले होते. अनंत पटेल खूप छान बोलतात. तो केवळ सर्वच मुद्द्यांवर आवाज उठवत नाही तर सोशल मीडियावरही सक्रिय असतात.

अनंत पटेल हे स्वतः आमदार असले तरी त्यांची पत्नी अजूनही शिकवणी घेते..

२०१७ मध्ये आमदार होण्याआधीही ते आदिवासींचे मोठे नेते होते. पण २०२२ च्या सुरुवातीला पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्प सुरू झाल्यावर त्यांची लोकप्रियता वाढली. .आंदोलनाचा मुख्य चेहरा ते झाले होते. तिथून ते प्रकाशझोतात आले. आदिवासी मतदार नेहमीच काँग्रेसच्या बाजूने असतात असं असलं तरी या मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी भाजपनेही गुजरात गौरव यात्रा काढली होती. ज्याचा मुख्य फोकस आदिवासी भागच होते. पण भाजपला त्याचा फायदा होत असल्याचं दिसत नाही. त्याचं कारण अनंत पटेलही असल्याचं बोललं जातं… ऑक्टोबर 2022 मध्ये अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्लाही केला होता. नवसारी जिल्ह्यातल्या खेरगाम शहरात अनंत यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्यांना आणि रिब्सला दुखापत झाली होती. यावेळी त्यांच्या गाडीवरही दगडफेक झाली होती. या हल्ल्यानंतर जिग्नेन मेवाणी यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली होती. अनंत पटेल यांनीही ट्विट केलं होतं

‘मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ोगे ??? मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे ?’।ही अनंत पटेल यांची जादू आहे की, जेव्हा महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला ब्रेक लागला तेव्हा राहुल गांधींनी सर्वात आधी पटेलांच्या प्रचारासाठी वेळ काढला.. ज्या ठिकाणी राहुलने सुरतच्या महुआ, येथे सभा घेतली होती तिथून आजूबाजूच्या जागांवर त्याचा परिणाम अपेक्षित आहे. दक्षिण गुजरातच्या या भागात काँग्रेसच्या चार विधानसभा आहेत. यामध्ये वांसदाचाही समावेश आहे.. आणि सद्य स्थितीत जिथून अनंत हे आमदार आहेत

    follow whatsapp