शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रूझवर छापेमारी करत NCB ने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. आर्यन खानसह अटक केलेल्या सर्व आरोपींना कोर्टाने एका दिवसाची NCB कोठडी सुनावली. आर्यन खानसोबतच NCB ने या छापेमारीत मुनमुन धमेचा आणि अरबाज सेठ मर्चंट यांच्यासह आणखी व्यक्तींवर कारवाई केली.
ADVERTISEMENT
प्रसारमाध्यमांमध्ये मुनमुन धमेचाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती नेमकी आहे तरी कोण याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार मुनमुन धमेचा ही एका व्यवसायिकाची मुलगी आहे. तसेच अरबाज सेठ मर्चंट हा आर्यन खानचा जवळचा दोस्त मानला जातो. त्यामुळे आर्यन खानसोबतच चर्चेत असलेली मुनमुन आहे तरी कोण याचा आपण आढावा घेणार आहोत.
मुनमुन धमेचा ही एका व्यवसायिकाची मुलगी असून ती फॅशन मॉडेल आहे. वय वर्ष ३९ असलेल्या मुनमुनला NCB ने शनिवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. मुनमुन ही मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातली रहिवासी आहे. सध्याच्या घडीला तिच्या परिवारातील कोणताही सदस्य मध्य प्रदेशात राहत नाही. मुनमुनच्या आईचं गेल्या वर्षी निधन झालं. मुनमुनचे वडील अमित कुमार धमेचा यांचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं.
Drugs Case मध्ये आर्यनचं नाव, शाहरुख ‘पठाण’ सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याची शक्यता
मुनमुनला एक भाऊ असून त्याचं नाव प्रिन्स धमेचा असं आहे, तो दिल्लीत काम करतो. मुनमुनने आपलं प्राथमिक शिक्षण हे सागर जिल्ह्यातच पूर्ण केलं. काही काळ मुनमुन भोपाळमध्ये वास्तव्याला होती. ज्यानंतर ती सहा वर्षांपूर्वी आपल्या भावासोबत दिल्लीला शिफ्ट झाली.
मुनमुन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 10.2 K फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर कोणतेही सेलिब्रेटी तिला फॉलो करतात असं दिसून आलेलं नसलं तरीही मुनमुन अक्षय कुमार, विकी कौशल यासारख्या कलाकारांना फॉलो करते.
NCB ने शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत आर्यन खान, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत चोक्कर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. आर्यन, मुनमुन आणि अरबाज व्यतिरीक्त इतर लोकांबद्दल फारशी माहिती कळू शकली नाही.
आधी शाहरुख नंतर आर्यन, ‘वानखेडे’ नावाचा पिता-पुत्रांना जबर दणका
ADVERTISEMENT