महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतं आहे. पूजा चव्हाणची आत्महत्या, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स, त्यातला अरूण राठोड, वनमंत्री संजय राठोड यांचं समोर आलेलं नाव, त्यांच्या राजीनाम्याची मागणी. अशा सगळ्यात आता पूजा अरूण राठोड या 22 वर्षीय तरूणीचा यवतमाळच्या रूग्णालयात गर्भपात झाल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भातला रुग्णालयाचा अहवालच समोर आला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे अहवालात?
यवतमाळ रूग्णालयाच्या या अहवालात 6 फेब्रुवारीला पूजा अरूण राठोड नावाच्या 22 वर्षीय तरूणीला यवतमाळच्या शासकीय वसंतराव नाईक रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केल्याची नोंद आहे. या तरूणीवर नेमके काय उपचार झाले ते समजू शकलेलं नाही मात्र जो अहवाल समोर आला आहे त्यामध्ये तिचा एकाएकी गर्भपात झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. गर्भपात का झाला त्याचे कुठलंही कारण या अहवालात देण्यात आलेलं नाही. यासंदर्भात डॉक्टर काहीही बोलण्यास तयार नाहीत.
या अहवालात काय नोंदी आहेत?
वसंतराव नाईक सरकारी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यवतमाळ असं सुरूवातीला छापण्यात आलं आहे.
MRD NO 1225890 असा देण्यात आला आहे.
रुग्ण नाव : सौ. पूजा अरूण राठोड
वॉर्ड क्रमांक 3
वय – 22 वर्षे
पेशंट कॅटेगरी- जननी शिशू सुरक्षा योजना
पत्ता- शिवाजीनगर, नांदेड, महाराष्ट्र
मासिक उत्पन्न- काहीही नोंद नाही
रुग्णालयात दाखल केल्याची तारीख- 6 फेब्रुवारी 2021
रुग्णालयात दाखल केल्याची वेळ पहाटे 4 वाजून 34 मिनिटं
या सगळ्या नोंदी या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पूजा अरूण राठोड नेमकी कोण हा प्रश्न समोर येतो आहे.
ADVERTISEMENT