उल्हासनगर: गर्लफ्रेंड कुणाची..? भर रस्त्यात दोन गटात तुफान हाणामारी

मुंबई तक

• 03:43 AM • 20 Apr 2022

मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: गर्लफ्रेंड कुणाची? यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. भररस्त्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या हाणामारीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये तीन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. नेमकी घटना […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर: गर्लफ्रेंड कुणाची? यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. भररस्त्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

हे वाचलं का?

या हाणामारीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये तीन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या भानू कोरी या तरुणाचे एका तरुणाशी प्रेम संबंध होते. मात्र काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकीब खान नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. याच कारणावरून खरा सगळा वाद उफाळून आला.

सोमवारी रात्री उशिरा भानू कोरी या तरुणाने शाकीबला फोन करून नेताजी चौकात बोलवून घेतले. मात्र भानूसोबत आधीपासून त्याचे मित्र असल्याची कुणकुण शाकीबला लागली आणि शाकिबने देखील त्याचे तीन मित्र बोलावून घेतले.

ज्यावेळी भानू आणि शाकिब हे आपआपल्या मित्रांसह एकमेकांसमोर आले त्यावेळी गर्लफ्रेंड कुणाची याविषयावरुन त्यांच्याच बराच वाद झाला आणि त्याचं पर्यावसन मारहाणीत झालं. यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. भररस्त्यात झालेल्या या हाणामारीचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भररस्त्यात झालेल्या या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हीडिओ आता समोर आला आहे. या हाणामारीत दोन्ही गटातले तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उल्हासनगर : मित्राच्या WhatsApp स्टेटसला बहिणीचा फोटो बघून सटकली; पोटात भोसकला चाकू

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक देखील करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान, उल्हासनगरमध्ये मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर देखील गुन्हेगारांना अटकाव घालण्याचं मोठं आव्हान आहे.

    follow whatsapp