आदित्य ठाकरे CM शिंदेंवर का खवळले… दावोसला असं घडलं तरी काय?

मुंबई तक

24 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:12 AM)

Aditya Thackeray serious accusation on CM Shinde: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे काही दिवसांपूर्वीच दावोस (Davos) दौऱ्यावर गेले होते. जिथे 1 लाख 67 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाला असल्याचा दावा हा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. याचबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) आज (24 जानेवारी) […]

Mumbaitak
follow google news

Aditya Thackeray serious accusation on CM Shinde: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे काही दिवसांपूर्वीच दावोस (Davos) दौऱ्यावर गेले होते. जिथे 1 लाख 67 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाला असल्याचा दावा हा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. याचबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) आज (24 जानेवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण दौऱ्यावरच जोरदार टीका केली आहे. (why did cm shinde reach davos late even though he took a charter plane aditya thackerays serious accusation)

हे वाचलं का?

‘अवघ्या एका दिवसात परतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या दावोस दौऱ्यात 40 कोटी तर खर्च झाले पण तरीही येथील बैठका आणि वेळापत्रक समोर आलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये जाऊन नेमकं काय केलं?’ असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

40 कोटींचं केलं काय? आदित्य ठाकरेंनी CM शिंदेना घेरलं!

‘आत जर आपण दावोस दौऱ्याचा थोडा अभ्यास केला तर असं कळून येतं की, महाराष्ट्र सरकारच्या जो अधिकृत कार्यक्रम होता तो एकंदर चार दिवसाचा असेल असं वाटतं. कारण 16 ते 20 असा कार्यक्रम ठरला होता. आता यावर अंदाजे खर्च हा 35 ते 40 कोटींच्या घरात आहे. हा खर्च अजूनही वाढू शकतो. कारण त्यांचा गेलेला मित्रपरिवार काही वेगळ्या गाड्या वापरल्या गेल्या. त्या खोलात मला जायचं नाही.’

‘म्हणजेच या चार दिवसांचा विचार केला तर खर्च हा सरासरी 10 कोटी प्रत्येक दिवसाला झाला. सरकारमध्ये खर्च दाखवायचा कसा हे त्यांना योग्य रितीने माहिती आहे. पण हे जरी झालं तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दावोसला जाताना जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी चार्टर विमानाचा वापर केला. साधारणपणे 2 ते 2.30 कोटी यावर खर्च झाला असेल. हा खर्च देखील राज्यावर आला असेल.’

मुंबईत ६ हजार कोटींचा जंबो घोटाळा : आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

‘मुद्दा असा येतो की, माझा आक्षेप हा त्या चार्टर विमानाला नाहीए. ठीक आहे मुख्यमंत्री चालले आहेत. काही महत्त्वाच्या बैठका असतात. वेळेत जायचं असेल तर घेऊन जाऊ शकतात. तो खर्च योग्य असेल. पण तुम्ही मला सांगा.. जेव्हा तुम्ही कमर्शिअल विमान सोडून देता आणि चार्टर विमान घेता तेव्हा तुम्ही ते वेळेवर पोहचण्यासाठी घेता की उशिरा पोहचण्यासाठी घेता? कारण 16 तारीख.. जो पहिला दिवस होता त्यादिवशी अनेक बैठका होत्या. काही उद्योजक त्यांना भेटणार होते त्यांचे देखील मला मेसेज आले की, आज मुख्यमंत्री आलेच नाही. थोडी माहिती घेतल्यावर असं कळलं की, मुख्यमंत्री साधारण 3.30 वाजता झुरीकला पोहचले. त्यानंतर 16 तारखेला साडे चार-पाच वाजता पोहचले दावोसला.’

‘दावोसचा पहिला दिवस हा 16 तारीख होता. मागच्या वर्षी आम्ही 22 मे 2022 ला पहिला दिवस होता. तेव्हा आम्ही आमच्या पॅव्हेलिअनचं उद्घाटन सकाळी साडे आठ वाजता केलेलं. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा उद्घाटन त्यांनी संध्याकाळी साडे सहा-सात वाजता केलेलं. विचार करा.. 40 कोटीचा खर्च, जाण्यासाठी चार्टर विमान.. एवढं सगळं करुन ज्या दिवशी बैठका महत्त्वाच्या असतात त्या सोडून संध्याकाळी जेव्हा दावोस जेव्हा शांत होतं. कारण बिझनेस डे हा सकाळी 7.30 ते संध्याकाळी 7.30 पर्यंत चालतो. त्यामुळे ते पोहचल्यानंतर फक्त 1-2 बैठका झाल्या असतील. पण आधीच्या बैठका होत्या त्या रद्द झाल्या आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांचं बैठकांचं वेळापत्रक कुठेही दिसलं नाही. 16 तारीख ही अशीच निघून गेली. महाराष्ट्रासाठी ज्या महत्त्वाच्या बैठका होत्या त्या सगळ्या तिथेच थांबल्या आणि घेतल्या नाही बैठका.’

‘इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं…; आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं

’17 तारीख उजाडली… अपेक्षा ही त्या दिवशी वेळेवर सुरू झाल्या असतील बैठका. मग 11 वाजता वैगरे.. त्यांची एक काँग्रेस.. तिथे काँग्रेस बोलतात त्याला ते म्हणजे काही लगेच काँग्रेसमध्ये गेले नाही. आधी जाणार होते आता नाही.. आता ते दुसऱ्या पक्षात गेले आहेत. पण तिकडंचं जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसमध्ये बोलायला एक स्लॉट होता. योगायोगाने त्याच काँग्रेसमध्ये मला बोलायला तीन स्लॉट मिळालेले. यंदा मुख्यमंत्री असताना देखील एकच स्लॉट मिळाला. त्यांनी काही तरी शाश्वत विकासावर भाषण केलेलं आहे. आता मला ते भाषण ऐकायचं आहे. ते भाषण मी शोधतोय. कारण आरेची झाडे कापल्यावर, जंगलाच्या खालून बोगदा काढल्यानंतर मुंबईचं जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री हे नक्की शाश्वत विकासावर काय बोलणार याबाबत मला उत्सुकता आहे.’

’17 तारखेला ज्या काही बैठका झाल्या असतील लगेच त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता ते तिथून निघाले आणि मुंबईला आले. म्हणजे हे एवढं हास्यास्पद आहे की, जे मुख्यमंत्री चार्टर घेऊन जातात. हे स्वत:साठी नाही तर महाराष्ट्रासाठी, देशासाठी महत्त्वाचं आहे.’

‘पण जेव्हा मुख्यमंत्रीच लेट पोहचतात कदाचित त्यांना जगाला दाखवायचं असेल की, आम्हाला काही पडलेली नाही. मग दुसऱ्या दिवशी ते सांगतात की, आम्ही कोणाचे माणूस आहोत. मग संध्याकाळी पुन्हा निघून येतात झपाट्याने. फक्त सांगायचं होतं की, तुम्ही कोणाचे माणूस आहात.. मग तुम्ही इथूनच.. त्या 33 देशांनी ज्यांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली त्यांना इमेल करू शकला असता. त्यावर 40 कोटी खर्च करण्याची गरज काय?’

‘यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये कोणत्या भेटी झाल्या, काय वेळापत्रक.. काही आमच्या लोकांसमोर आलं नाही. आमचं वेळापत्रक मी तुमच्या हाती देतो. त्यात सगळं आहे. जे जगजाहीर आहे.’ असा गंभीर सवाल आदित्य ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थिती केले आहेत.

आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अडचणीत आणत आहेत. अशावेळी आता CM शिंदेंकडून नेमकं आदित्य ठाकरेंना कशाप्रकारे उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp