Ajit Pawar has revealed that Uddhav Thackeray has already given the idea of rebellion: मुंबई: राज्यात साधारण सहा महिन्यांपूर्वी एक मोठं राजकीय बंड घडलं. ज्याने राज्यातील सत्ताकारणच बदललं. पण या बंडाची आपल्याला आधीच माहिती होती असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. ते लोकमत वृत्त समूहाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवारांनी या बंडाबाबत संपूर्ण वृत्त कथन केलं. ज्यानंतंर आता शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सगळं माहित असूनही आपल्या आमदारांवर एवढा डोळे झाकून विश्वास का टाकला? असा सवाल निर्माण झाला आहे. (why did uddhav thackeray blindly trust his mlas new discussion in political circle after ajit pawars explanation)
ADVERTISEMENT
खरं तर पक्षातील काही आमदार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंडखोरी करणार ही माहिती उद्धव ठाकरेंना आधीच देण्यात आलेली. पण तरीही त्यांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. या सगळ्याबाबत अजित पवार नेमकं काय म्हटले हे आधी आपण सविस्तर जाणून घेऊया.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
‘मी सहा महिनेआधीच उद्धव ठाकरेंना सांगितलेलं…’
‘एकदम सुरुवातीला.. सहा महिनेआधी म्हणजे जूनच्या आधीच अशा पद्धतीने थोडीशी कुजबूज कानावर आली होती. तर अशी कुजबूज कानावर आल्यावर माझी आणि सीएम साहेबांची मीटिंगच्या निमित्ताने भेटीगाठी व्हायचं त्या वेळीही मी त्यांना सांगितलं होतं. त्यावेळेस ते म्हणाले होते की, माझ्या ते कानावर आलं आहे. मी एकनाथजींना बोलावून घेतो आणि काय असेल ते बघतो. आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यातून मी मार्ग काढतो.’ असं अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदेंचं बंड : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस-अमित शाहांना फोन, दहा दिवसांत काय घडलं?
‘पवार साहेबांनी देखील उद्धव ठाकरेंना सांगितलेलं…’
‘दोन-तीन वेळेला तशा प्रकारची माहिती पण मिळाली. तशा प्रकारची माहिती उद्धव ठाकरेंना स्वत: पवार साहेबांनी माहिती दिली. आम्ही लोकांनी पण दिली. त्याबद्दल पवार साहेबांनी ताबडतोब फोन देखील केले. मीटिंग पण झाल्या. पण उद्धवजी म्हणायचे की, माझा माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाही. असं त्यांना वाटायचं. पण पहिला जो ग्रुप 15-16 आमदारांचा गेला त्यातून पण ज्या प्रकारे बाकीच्या सगळ्यांना एकजुटीने ठेवण्याची गरज होती तशा प्रकारची गरज दाखवली गेली नाही.’ अशी माहितीही यावेळी अजित पवारांनी दिली.
‘नंतर-नंतर हे जेव्हा वाढत गेलं तेव्हा दीपक केसरकर असतील, दादा भुसे असतील, उदय सामंत, गुलाबराव पाटील हे जे काही मंत्रिगण होते. आपण पाहत होतो की, ते वर्षावर पण जात होते चर्चा करत होते. पण का आमच्या त्यावेळेसच्या सरकारमधल्या प्रमुखांनी थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी घडून दिल्या ते कळायला मार्ग नाही.’ असं म्हणत अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं.
‘उद्धव ठाकरेंसोबत गलिच्छ राजकारण झालं’
‘ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं, ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण झालं. म्हणजे सांगताना असं सांगितलं गेलं की, आमचा दुरान्वये आमचा संबंध नाही. आम्ही पाहतोय त्यांच्यातील त्यांच्यात वाद आहे. नंतर मात्र आठवड्यातच सांगितलं. की, आमक्याला फोन करुन सुरतला पाठवलं, मी तमक्याला फोन करून गुवाहटीला पाठवलं. हे जे काही राजकारण आहे लोकशाहीपणे दिलदारपणे विरोधकांशी वागलं पाहिजे आणि विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांशी तसं वागलं पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. जी शिकवण यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिली आहे त्याचा पूर्णपणे चक्काचूर केला.’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
”बालाजी तेरे को गोली मारने का दिन आया है”; बंडखोर आमदार किणीकरांना जीवे मारण्याची धमकी
‘उद्धव ठाकरेंनी डोळे झाकून विश्वास टाकला’
‘जे गृहमंत्री होते त्यांनाही अंदाज आला होता की, कुठे बैठका सुरू आहेत वैगरे. काही जण वेशांतर करून रात्री बाहेर पडायचे. हे त्यांच्याच धर्मपत्नीने सांगितलं. मी काही कुणावर आरोप करत नाही. मला कुणावर आरोप करायला आवडत पण नाही. पण हे जे काही चाललं होतं ते काही झाकून राहत नाही.’
‘त्या-त्या वेळेसची परिस्थिती लक्षात घेऊन लगेच कुठे चुकत असेल तर दुरुस्त केलं पाहिजे होतं. पण डोळे झाकून विश्वास टाकला गेला आणि त्या विश्वासाला तडा गेला.’ असं सांगत अजित पवारांनी एक प्रकारे बंडखोर आमदारांवरच यावेळी निशाणा साधला.
Aditya Thackeray : “उद्या बंडखोर रस्त्यावर दिसले तर इतकंच विचारा गद्दारी का केली?”
शिवसेनेच्या बंडाशी भाजपचा संबंध होता?
सुरुवातीला भाजप नेते सातत्याने म्हणत होते की, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. पण असं असताना काही दिवसांनी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी कबुली दिली की, हे सरकार बनविण्यात भाजपचा हात होता. याबाबत त्यांनी बच्चू कडूंविषयी देखील एक किस्सा सांगितला.
‘मी स्वत: फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की, आम्हाला सरकार बनवायचं आहे. तुम्ही सोबत हवे आहात. आमची अशी इच्छा आहे की, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं. माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहटीला गेले.’ असं फडणवीस स्वत: म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंनी आमदारांवर एवढा विश्वास कसा ठेवला?
शिवसेनेचं आजवरचं राजकारण आपण पाहिलं तर ते सर्वाधिक भावना आणि अस्मिता यावर चालत आलं आहे. पण असं असलं तरीही राजकारणात खुर्ची मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी अनेक निर्णय हे अतिशय कठोरपणे घ्यावे लागतात. पक्षावर एक प्रकारची जरब असणं गरजेचं असतं. पण याच बाबतीत काहीसे उद्धव ठाकरे कमी पडले असल्याचे त्यांचे निकटवर्तीय देखील सांगतात.
स्वत: उद्धव ठाकरेंनी देखील याबाबत सांगितलं की, त्यांनी कोणत्याही आमदाराला स्वत:हून थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. जे आमदार आधीच मनाने शिवसेनेसोबत नव्हते त्यांना जबरदस्तीने थांबविण्यात अर्थ नव्हता असं उद्धव ठाकरे म्हणालेले.
मात्र, प्रॅक्टिकल राजकारणात या सगळ्या गोष्टींना थारा नसतो. तुमच्याकडे संख्याबळ किती आहे हे अंतिम असतं. जे उद्धव ठाकरेंना काही टिकवता आलं नाही आणि म्हणूनच त्यांना आपली सत्ता आणि खुर्ची गमवावी लागली.
ADVERTISEMENT