धनंजय मुंडेंचाही राजीनामा घेणार का?? उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई तक

• 03:38 PM • 28 Feb 2021

टिकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्विकारला. रविवारी दुपारी वर्षा बंगल्यावर संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला. १ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राठोड प्रकरणावरुन विरोधकांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. अवश्य वाचा – […]

Mumbaitak
follow google news

टिकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्विकारला. रविवारी दुपारी वर्षा बंगल्यावर संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला. १ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राठोड प्रकरणावरुन विरोधकांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – संजय राठोड राजीनामा : दिवसभरात काय काय घडलं? जाणून घ्या…

दरम्यान काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही रेणु शर्मा या महिलेने आरोप केले होते. या आरोपांमुळेही महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ माजला होता. संजय राठोडांवर कारवाई केल्यानंतर सरकार धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ठाकरे यांनी, “धनंजय मुंडे प्रकरणात तक्रारदार महिलेने स्वतःहून आपली तक्रार मागे घेतली आहे. इथे संजय राठोड नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत आहेत. विरोधकांना तरीही तपासावर विश्वास नाहीये आणि ते अधिवेशन चालू देणार नाही असं म्हणतायत.”

अवश्य वाचा – या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला संजय राठोडांचा राजीनामा

यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुजा चव्हाणचे आई-वडिल आपल्याला भेटून गेल्याचं सांगितलं. यावेळी चव्हाण कुटुंबियांनी पत्र लिहून आपल्या मुलीच्या होणारी बदनामी थांबवावी अशी विनंती केल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी लिहीलेलं पत्र वाचून दाखवलं. आम्हाला पोलीसांच्या तपासावर विश्वास आहे. याप्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कमा नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

    follow whatsapp