गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले….

मुंबई तक

• 10:49 AM • 11 Jan 2022

गोवा विधानसभेची निवडणूक होण्यासाठी आता जेमतेम एक महिना उरला आहे. 14 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे. अशात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसंच गोव्यातले स्थानिक पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देणार का? महाराष्ट्रात महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला ज्यामुळे भाजपचे सर्वाधिक आमदार येऊनही त्यांना विरोधात बसावं लागलं. आता असाच प्रयोग गोव्यात […]

Mumbaitak
follow google news

गोवा विधानसभेची निवडणूक होण्यासाठी आता जेमतेम एक महिना उरला आहे. 14 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे. अशात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसंच गोव्यातले स्थानिक पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देणार का? महाराष्ट्रात महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला ज्यामुळे भाजपचे सर्वाधिक आमदार येऊनही त्यांना विरोधात बसावं लागलं. आता असाच प्रयोग गोव्यात केला जाणार का? याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई तकशी संवाद साधला आहे. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला! मायकल लोबोंनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

‘काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे. आम्ही नक्कीच काही काळापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. आमच्यापेक्षा गोव्यात काँग्रेसचं बळ जास्त आहे यात काही शंकाच नाही. काँग्रेसचे अनेक माजी मुख्यमंत्री कोलांटउड्या मारत असतात. त्यांचे आमदारही मोठ्या प्रमाणात होते. शिवसेनाही गोव्यात बरंच काम करते आहे. निवडणुका जिंकणं किंवा न जिंकणं हा सगळा नंतरचा भाग झाला. आमचा पक्ष जमिनीवर काम करतो आहे.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मुलाखत मी ऐकत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की एक काळ असा होता की त्यांनी 14 उमेदवार गोव्यात दिले होते आणि सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली होती. ही अशी सुरूवातही होऊ शकते. आम्ही पक्ष म्हणून काम करतो आहोत. आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. गोव्यात आम्ही वाढण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र एक मान्य केलं पाहिजे की गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी जास्त पैसे लागतात. हे लक्षात आल्यापासून शिवसेना काही प्रमाणात अस्वस्थ आहे. गोव्यासारख्या राज्यात आज इकडे असलेला आमदार दहा मिनिटात कुठे जाईल ते कळत नाही. पक्षांतराच्या रोगापासून कोणताही राजकीय पक्ष सुटलेला नाही. मी इतकंच सांगेन की गोव्यात धनिकांचं आणि माफियांचं राजकारण सुरू आहे असाही आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भ्रष्टाचाराची गंगोत्री निवडणूक आहे. त्या पैशातून सत्ता मिळवायची मग पुन्हा निवडणू लढवायची ही सगळं दुष्टचक्र आहे हे कुणीही थांबवू शकत नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp