सुशांत सिंह राजपूतच्या केसवर राम गोपाल वर्मा बनवणार सिनेमा?

मुंबई तक

• 07:37 AM • 07 Apr 2021

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आज त्यांचा 60 वाढदिवस साजरा करतायत. राम गोपाल वर्मा यांचे अने सिनेमे सुपरहीट ठरलेत. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिचा चक्रवर्तीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तर आता राम गोपाल वर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आज त्यांचा 60 वाढदिवस साजरा करतायत. राम गोपाल वर्मा यांचे अने सिनेमे सुपरहीट ठरलेत. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिचा चक्रवर्तीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तर आता राम गोपाल वर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या केसवर सिनेमा बनवणार असल्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

66व्या फिल्मफेअर पुरस्कारांची नामांकन जाहीर; सुशांत सिंह राजपूतचं सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन

एक वेबसाईटच्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांना सुशांत सिंह राजपूत केसच्या फिल्म संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राम गोपाल वर्मा म्हणाले, “कदाचित हो, कदाचित नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामधून आपल्याला निवडावं लागतं. किमान माझ्यासाठी तरी असंच आहे. मला वाटतं की कदाचित मी त्यावर एक सिनेमा तयार करेन.”

याशिवाय सुशांतवरून सोशल मीडियावर ट्रोल करण्याबाबत राम गोपाल वर्मा म्हणाले, “सोशल मीडियाबाबत म्हणाल तर, मला माहित नाही की सुशांतच्या केसमध्ये नेमकं काय झालं. मला असं वाटतं की लोकं आता त्याला विसरले आहेत. रिया चक्रवर्तीचं काय झालं याबाबत देखील मला काही कल्पना नाही. माझ्या मताने सोशल मीडिया एक सर्कस आहे. इथे लोकं येऊन फार गोंधळ घालतात आणि त्यानंतर सर्वकाही विसरून जातात.”

गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी आणि राजकारणात बरीच उलथा पालथ झालेली पहायला मिळाली. सुशांतच्या आत्महत्येचं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वी भारतीय राजकारणावर चित्रपटही बनवलेत. त्यामुळे आता सुशांत सिंह राजपूतवर सिनेमा बनवणं त्यांच्यासाठी एक रंजक विषय ठरू शकतो.

    follow whatsapp