महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी तर ४० हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का? हा प्रश्न कायम आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे असं म्हटलं तसंच तसे संकेतही दिले. मात्र पुन्हा लॉकडाऊन करण्याला भाजपने विरोध दर्शवला आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विरोध होतो आहे. अशात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले राजेश टोपे?
सध्या आपल्याकडे असलेली संसाधनं म्हणजेच बेड्स, डॉक्टर्स, औषधं या सगळ्याचं आपण मोजमाप रोज करत असतो. जेणेकरून आपण समोर आलेल्या संकटाचा समर्थपणे सामना करू शकतो. लॉकडाऊन हा जो विषय आहे तो कुणालाच मान्य नाही, तो कुणाला आवडतही नाही. पण परिस्थिती जेव्हा तशी येते तेव्हा तहान लागल्यावर विहिर खणण्यात अर्थ नसतो. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कारण त्यांनी आम्हा सगळ्यांसोबत चर्चा केली आहे. काही निर्बंध कडक करायचे असतील तर काय करायचं? उद्योग क्षेत्राला हात लावला जाणार नाही, बांधकाम व्यवसायाला धक्का लागू नये या सगळ्यासाठी अभ्यास सुरू आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे.
लोक निष्काळजीपणा करत आहेत..
लोक निष्काळजीपणा करत आहेत तो त्यांनी करू नये. सांगितलेल्या निर्बंधांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे, गर्दी न करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे.
ज्या लोकांना लक्षणं नाहीत त्या लोकांनी होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. पण लोक होम आयसोलेशनचे नियमही नीट पाळत नाहीत असं चित्र आहे. लोक त्यांचा वावर थांबवत नाहीत त्यामुळे छोट्या घरात आयसोलेशन झालं असेल तर त्या घरातल्या सगळ्या सदस्यांना कोरोना होऊ शकतो. मग जेव्हा अशा रूग्णांची प्रकृती गंभीर होते तेव्हा त्यांना रूग्णालयात आणलं जातं. ही बाब योग्य नाही त्यामुळे छोट्या घरातल्या लोकांना कोरोना झाल्यास त्यांनी तातडीने रूग्णालयात दाखल व्हावं, त्यासंदर्भातल्या सूचना मी अधिकाऱ्यांनाही दिल्या आहेत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. लोकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती मी करतो आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

‘१ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार’
लसीकरणाची गती वाढवणं आवश्यक
महाराष्ट्रात लसीकरण वाढवणं गरजेचं आहे, आत्ताही आपण वेगाने लसीकरण करतो आहे. मात्र हा वेग आणखी वाढवायचा आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. आज तरी आपण निर्बंध कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र जर बेड्सची उपलब्धता कमी झाली तर लॉकडाऊन करावाच लागेल. लोकांनी घालून दिलेले निर्बंध पाळले नाहीत तर मात्र नाईलाजाने इच्छा नसतानाही आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून निर्णय घ्यावा लागेल. या संबंधीचा अभ्यास आणि निरीक्षण सुरू आहे. लॉकडाऊन कुणालाच नको आहे.. मात्र संपूर्ण स्थितीचा साधक बाधक विचार करून आणि अर्थचक्रही चालू राहिल या अनुषंगाने आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT