पतीच्या वागण्या-बोलण्यावर संशय आल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवली त्याचा पाठलाग केला. पती आणि त्याची मैत्रीण कारमधून औरंगाबादच्या वरद गणेश मंदिर चौकालगतच्या एका हॉटेलमधे जात होते. त्यावेळी या माणसाच्या पत्नीने या दोघांना गाठत पतीच्या मैत्रिणीला धू धू धुतले. पतीच्या मैत्रिणीला मारहाण करत असतानाचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तसंच औरंगाबादमधला हा व्हीडिओ चर्चेचा विषयही ठरला आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे प्रकरण?
औरंगाबादमधल्या सिडको भागात गणपती मंदिर भागातला हा व्हीडिओ आहे. तिथल्या एका महिलेला पतीच्या वागण्या-बोलण्यावर संशय होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ती महिला पतीवर पाळत ठेवून होती. बुधवारी तिने पाळत ठेवून त्याचा पाठलाग केला. त्यावेळी या महिलेचा पती आणि त्याची मैत्रीण दोघंही हॉटेलमध्ये चालले होते. त्याचवेळी त्या माणसाची पत्नी तिथे आली आणि तिने पतीच्या मैत्रिणीला शिव्या तर दिल्याच आणि धू-धू धुतलं. या सगळ्या प्रकारात तिघांमध्येही झटापट झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही वेळाने लोकही मधे पडले आणि त्यांनी या प्रकरणात लक्ष घालत भांडण थांबवण्याचाही प्रयत्न केला. मात्र महिलेच्या आक्रमक तिच्या पतीची आणि त्याच्या मैत्रिणीची तारांबळ झालेली पाहण्यास मिळाली.
ADVERTISEMENT