लखनऊ: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पिवळी साडी परिधान केलेल्या महिला मतदान अधिकाऱ्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. आता 2022 च्या विधानसभा निवडणुकीत देखील तीच महिला मतदान अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रीना द्विवेदी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. लखनऊच्या रहिवासी असलेल्या रीना द्विवेदी या वेळी लखनऊच्या मोहनलालगंज विधानसभेच्या गोसाईगंज बूथवर मतमोजणी करणार आहेत.
ADVERTISEMENT
मागच्या वेळी पिवळ्या साडीत दिसलेली रीना द्विवेदी यावेळी वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून आली. सोशल मीडियाच्या हेडलाइन्स बनलेल्या रीना द्विवेदीने यावेळेस मात्र आपला गेटअप बदलला आहे. गेल्या निवडणुकीत रीना द्विवेदी पिवळ्या साडीत दिसली होती आणि पिवळ्या साडीतील तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी मात्र रीना द्विवेदी वेगळ्याच लुकमध्ये पाहायला मिळाली आहे.
वेस्टर्न ड्रेस आणि सनग्लास परिधान केलेल्या रीना द्विवेदी म्हणाल्या की, ‘मी मागच्या वेळी पिवळी साडी नेसली होती. यावेळी थोडा बदल झाला आहे. हा बदल होत राहायला हवा.’ रीना द्विवेदीचा नवा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रीना द्विवेदी लखनऊ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत रीना द्विवेदी निवडणूक ड्युटीवर होत्या. यावेळी उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत त्या मोहनलालगंजमध्ये मतदानाच्या कामात गुंतल्या आहेत. मंगळवारी, रीना द्विवेदी EVM मशीन घेऊन जात असताना काळ्या स्लीव्हलेस टॉप आणि ऑफ-व्हाइट ट्राउझरमध्ये पोलिंग पार्टीसोबत आपल्या ड्युटीसाठी निघाल्या होत्या.
नवीन गेट अपमध्ये आलेल्या रीना द्विवेदी यांना पाहण्यासाठी तेथे मोठी गर्दी झाली होता. लोकांसोबत पोलिसही त्यांच्यासोबत सेल्फी घेत होते. ‘आज तक’शी बोलताना रीना द्विवेदी म्हणाल्या, ‘मी फॅशन फॉलो करते, मला नेहमीच अपडेट राहायला आवडते. त्यामुळे मी गेटअपही बदलला आहे.’
त्या पुढे असंही म्हणाल्या की, ‘माझा फोटो व्हायरल झाला तर मला हरकत नाही. मला मतदान करायला आवडतं आणि ते करायला देखील हवं. व्हायरल झालेला माझा फोटो या गोष्टीकडे मी सकारात्मक पद्धतीने पाहते.’
दरम्यान, 2019 मध्ये त्यांच्या फोटोची बरीच चर्चा रंगली होती. आताही देखील त्यांच्या नव्या लुकमधील फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT