कोरोनाचं संकट टाळण्यासाठी भारतासह जगभरात सध्या लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी लस घ्यावी आणि त्याचबरोबर लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमही राबवले जात आहे. असाच उपक्रम ऑस्ट्रेलियामध्ये मिलियन डॉलर वॅक्स लॉटरीच्यावतीने राबवण्यात आला. यात एक महिला तब्बल 7 कोटी रुपयांची मालकीण बनली.
ADVERTISEMENT
कोरोनाची लस घेतल्यानं ऑस्ट्रेलियातील एका महिलेचं नशीबचं उजळलं आहे. ‘डेली मेल’ने या घटनेचं वृत्त दिलं आहे. दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियातील मिलियन डॉलर वॅक्स लॉटरीने लस घेणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्याची घोषणा केली होती. हे बक्षीस मिळवण्यासाठी तब्बल 30 लाख लोकांनी नोंदणी केली होती. मात्र, यात एका 25 वर्षीय महिलेचं आयुष्यचं बदलून गेलं.
लसीकरणाचा कोल्हापुरी पॅटर्न! विशेष मोहिमेत 122 महिलांचं लसीकरण, लकी ड्रॉमधून मिळणार बक्षीसं
25 वर्षीय जोआन झू नावाच्या महिला एक मिलियन डॉलर अर्थात 7.28 कोटी डॉलरची मालकीण झाली आहे. बक्षीस मिळवण्यासाठी नोंदणी केलेल्या लाखो लोकांमधून जोआन झूला लॉटरी लागली. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मिलियन डॉलर वॅक्स लॉटरीकडूनही प्रयत्न केले जात आहेत, असं या लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठीच लस घेणाऱ्यांना बक्षिसे दिली जात आहेत.
४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण, महाराष्ट्रातलं हे गाव ठरतंय देशासाठी आदर्श
वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात नागरिकांचं कोरोना लसीकरण केलं जात आहे. मात्र, अनेक महिने लोटूनही लोक लस घेण्यासाठी इच्छुक नसल्याचं दिसत आहेत. अधिकाधिक लोकांनी लसीकरणात सहभागी व्हावे म्हणून मिलियन डॉलर वॅक्सने लॉटरीची योजना तयार केली. या योजनेचाही परिणामही ऑस्ट्रेलियात दिसून आला. काही दिवसांतच लाखो लोकांनी लस घेण्यासाठी नोंदणी केल्याचं वृत्तामध्ये म्हटलं आहे. कंपनीने जोआन झू यांच्याबरोबरच लस घेणाऱ्या इतर 100 नागरिकांनाही बक्षीसं दिली आहेत.
ADVERTISEMENT