उद्धव ठाकरे यांना आणखी एका मोठ्या बंडाला सामोरं जावं लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पासून फुटून आमदारांनी बंड केलं. आता खासदारांचा देखील एक गट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. आज शिवसेनेच्या 10 पेक्षा जास्त खासदारांनी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. ज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या भावना गवळी यांचा देखील समावेश होता.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे गटाने काही जणांची कार्यकारिणी जाहीर केली. भावना गवळी यांची लोकसभेतील प्रतोदपदी नियुक्ती कायम ठेवली.
भावना गवळींचं एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या जवळ असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची हक्कलपट्टी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत होती. यामध्ये भावना गवळी यांच्या समर्थकांचा देखील समावेश होता. त्यामुळे आतापर्यंत उघड शिंदे यांचं समर्थन न करणाऱ्या भावना गवळी समोर आल्या ते थेट शिंदे यांच्यासोबतच.
त्यांच्यासह इतर खासदार देखील शिंदे यांच्यासोबत दिसतायेत. त्यामुळे लोकसभेतील सदस्य गटात देखील उद्धव ठाकरे यांच्यासमोर कायदेशीरपेच निर्माण होऊ शकतो.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. तशी तक्रारकिरीट यांनी ईडीकडे केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीकडून भावना गवळी यांच्या कार्यालयांसह सात ते आठ ठिकाणी छापेमारी केली गेली. यात यवतमाळ येथील भावना गवळी यांचं कार्यालय, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे असलेल्या उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.
भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून 18 कोटी रुपये काढलेले आहेत. त्यात सात कोटीं चोरीला गेल्याची तक्रारदिलीये. केंद्र सरकारचे 44 कोटी 11 कोटी रुपये स्टेट बँकेचे आहेत. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना 55 कोटींतउभारण्यात आला आणि भावना अॅग्रो लिमिटेडने फक्त 25 लाखांत तो खरेदी केला, असे आरोप त्यांच्यावर होते.
घर, शैक्षणिक संस्था, कार्यालयावर धाडीनंतर ईडीने त्यांना कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावला होता. ईडीला घाबरून शिंदे गटातील काही आमदारांनी बंडखोरी केली, असा आरोप होत होता. त्यादरम्यान भावना गवळी यांनी आपण भाजपासोबत जायला पाहिजे, असं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहले होते. तेव्हापासून गवळी या कधीही शिंदे गटात जातील अशा चर्चा सुरु झाल्या. अखेर मंगळवारी त्या दिल्लीतील खासदारांच्या भेटीत एकनाथ शिंदेंसोबत दिसल्या. सोबत त्यांचं प्रतोदपद देखील कायम राहिलं आहे.
ADVERTISEMENT