ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे आलेलं संकट आणि कोरोनाचं वातावरण लक्षात घेता ठाकरेंनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या आयुष कांबळे या साडेचार वर्षाच्या तरुणाने मोझ्यक पोट्रेटमधून उद्धव ठाकरेंची प्रतिमा साकारली आहे.
पोर्ट्रेट तयार करण्यासाठी 4500 कागदी फुलांचा वापर करण्यात आला आहे. 4 फूट उंची आणि 3 फूट लांबीचे पोर्ट्रेट आहे.
हे पोर्ट्रेट साकारण्यासाठी आयुषला १२ तासाचा अवधी लागला.
या आधीही लॅकडाऊन मध्ये आयुष कांबळे याने आपला मामा चेतन राऊत सोबत अनेक कलाकृती साकारण्यात सहभाग घेतला आहे. चेतन राऊत हा देखील एक मोझ्यक कलाकार असून त्याच्या नावावर १४ विश्वविक्रम जमा आहेत.
आयुष ने साकारलेल्या ह्या पोर्ट्रेट ची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये केली आहे.
मोझ्याक पोर्ट्रेट साकारणारा भारतातील पहिला बालकलाकार ठरला आहे.
Young Phoenix International Preschool मध्ये सध्या ज्युनिअर के.जी मध्ये आयुष शिकत आहे.
ADVERTISEMENT