आतापर्यंत आपण चोरांच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतली. काही जणांना परिस्थितीमुळे चोरी करावी लागते तर काहीजणं ही निव्वळ मजामस्ती आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगता यावं म्हणून चोरी करतात. नागपूरमध्ये असाच एक प्रकार पुढे आला आहे. ज्यात सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एका सधन घरातील उच्चशिक्षीत तरुणीला अटक केली आहे. या मुलीला अटक केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तीने पाकीटमारीतून चोरलेला मुद्देमालही पोलिसांना मिळाला आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये या महिलेने २० ठिकाणी चौऱ्या केल्याचं समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असणारी ही तरुणी केवळ २७ वर्षांची आहे. या तरुणीच्या घरची आर्थिक स्थिती सधन आहे. इतकच नव्हे तर अभ्यासात हुशार असलेल्या या मुलीने डबल एम. ए. केलं असून तिचं मराठी, इंग्रजीसह आणखी तीन ते चार भाषांवर प्रभुत्व आहे. असं असूनही काही वर्षांपूर्वी तिला चोरीची सवय लागली आणि तिने नागपूर शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली.
कोल्हापूर: लग्न झालेली प्रेयसी प्रियकरासोबत पळून आली कोल्हापुरात, धर्मशाळेत गळफास घेऊन दोघांचीही आत्महत्या
संबंधित पाकिटमार तरुणीने गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम आणि दागिने लंपास करण्याचा सपाटाच लावला होता.
असंं पहिल्यांदाच घडलं.. स्वत: कॉलेजनं कमी लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांची नावं कॉलेजबाहेर झळकवली!
पोलिसांनी केलेल्या चौकशीत या तरुणीने आपल्याला चोरीची सवय कशी लागली याची माहिती दिली. काही वर्षांपूर्वी हॉस्टेलमध्ये राहात असताना, कानपूरमधील एका उच्चभ्रू तरुणीने तिला चोऱ्या करायला शिकवलं. त्यानंतर पुढील काही दिवस आरोपी तरुणीने तिच्यासोबत काही ठिकाणी चोऱ्या केल्या. पण चोरीचा माल वाटून घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर संबंधित तरुणीनं स्वत:च चोऱ्या करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षात तिने तब्बल 20 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. चोरीतून मिळालेली रक्कम तिने मौजमजेसाठी खर्च केली आहे. पण तब्बल वीस लाखांचं सोनं तिने घरातील एका डब्ब्यात लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सोनं विकायला गेलो तर, आपलं बिंग फुटेल या भितीपोटी तिने सोनं विकलं नव्हतं.
पंढरपूर: घर पेटवून देणारे चोरटे.. चोरीही केली अन् घराला आगही लावली!
तरुणीने आपली कहाणी सांगितल्यानंतर पोलीसही चांगलेच चक्रावून गेले. तू शिकलेली आहेस, चांगल्या घरची आहेस, मग असं का करतेस असा प्रश्न विचारला असता या तरुणीने पोलिसांना आप ये नहीं समजेंगे असं उत्तर दिलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT