तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत मलंगगड भागात तरूणांना मारहाण, दोन तरूणींचा विनयभंग

मुंबई तक

• 09:57 AM • 04 Aug 2021

केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण देत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणीना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी  बेदम मारहाण केली. हे सगळं प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही तर या टवाळखोरांनी तरूणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतःची कशीबशी […]

Mumbaitak
follow google news

केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण देत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणीना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी  बेदम मारहाण केली. हे सगळं प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही तर या टवाळखोरांनी तरूणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

हे वाचलं का?

अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेत नेवाळी पोलीस ठाणं गाठलं मात्र पोलिसांकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही हिल लाईन ला जा असे सांगत वाटेला लावण्यात आले. मात्र यातील पीडित तरुणीने हिंमत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

या घटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाजकंटकांवर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वताच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असा प्रश्न देखील विचारला गेला आहे.

काय घडलं?

मलंगगड भागात दोन तरूण आणि दोन तरूणी असे चौघेजण फिरायला गेले होते. त्यावेळी तुम्ही इथे तोकडे कपडे घालून का आलात? अशी विचारणा मलंगगड भागात असलेल्या पाच-सहा जणांच्या टोळक्याने त्यांना केली. एवढंच नाही तर त्यासाठी या सगळ्यांना चोपही देण्यात आला. चोप दिल्यानंतर या टवाळखोरांनी मुलींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेलेल्या या चौघांच्याही पदरी निराशा पडल्यानंतर यातल्या एका पीडित तरूणीने या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ज्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

    follow whatsapp