आधुनिक श्रावणबाळ ! आईच्या ५० व्या वाढदिवसाला घडवून आणली हेलिकॉप्टर वारी

मुंबई तक

• 03:23 PM • 17 Aug 2021

आई-बाबांना कावडीतून यात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावणबाळाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. आधुनिक जगात ठाणे जिल्ह्यातील एका युवकाने श्रावणबाळाचं दर्शन घडवलं आहे. लहानपणापासून घरकाम करुन आपल्याला मोठं करणाऱ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने तिला हेलिकॉप्टरची राईड घडवून आणली. उल्हासनगरच्या प्रदीप गरडने आपल्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे. रेखा गरड या मुळच्या सोलापूर […]

Mumbaitak
follow google news

आई-बाबांना कावडीतून यात्रेला घेऊन जाणाऱ्या श्रावणबाळाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. आधुनिक जगात ठाणे जिल्ह्यातील एका युवकाने श्रावणबाळाचं दर्शन घडवलं आहे. लहानपणापासून घरकाम करुन आपल्याला मोठं करणाऱ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाने तिला हेलिकॉप्टरची राईड घडवून आणली. उल्हासनगरच्या प्रदीप गरडने आपल्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

हे वाचलं का?

रेखा गरड या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या रहिवासी आहेत. लग्नानंतर त्या उल्हासनगरात स्थायिक झाल्या. मुलं लहान असनाताच रेखा यांचे पती दिलीप गरड यांचं निधन झालं. त्यावेळी रेखा यांचा मोठा मुलगा सातवीत, मधली मुलगी पाचवीत तर लहान मुलगा पहिलीत होती. परंतू यानंतर रेखा यांनी हार न मानता घरकाम करुन आपल्या तिन्ही मुलांना मोठ्या कष्टाने वाढवलं. मोठा मुलगा प्रदीपला रेखा यांनी आश्रमशाळेत शिकायला घातलं.

प्रदीपनेही जिद्दीने शिक्षण पूर्ण करत नोकरी करायला सुरुवात केली. प्रदीप हा बारावीला असताना अचानक एक दिवस त्यांच्या घरावरून हेलिकॉप्टर गेले आहे. यावेळी आपल्याला कधी यात बसायला मिळेल का? असे रेखा या सहज बोलून गेले आहेत. ती गोष्ट प्रदीपच्या मनात पक्की बसली. पुढे नोकरीत प्रगती करत प्रदीप हा आई आणि कुटुंबाला घेऊन चाळीतून स्वतःच्या फ्लॅटमध्ये आला. लग्न झाले, दोन मुलं झाली, पण आईची ‘ती’ इच्छा कशी पूर्ण करावी? याची सतत त्याला बोचत होती. अखेर आईच्या ५० व्या वाढदिवसाला तिला सरप्राईज म्हणून, हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली होती. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी प्रदीपचे वाढदिवस असतो. त्यानुसार चौकशी करून त्याने सगळी तयारी केली आणि वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचं असल्याचे सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेले.

तिथं हेलिकॉप्टर पाहून आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आईसह प्रदीप, प्रदीपचे लहान भाऊ संदीप, प्रदीपची पत्नी, मुले यांनीही हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला. यावेळी प्रदीपची आई रेखा गरड या भावनिक झाल्या होत्या. ज्या आईनं आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच आईची इच्छा पूर्ण करत तिला घेऊन हेलिकॉप्टरने आकाशाला गवसणी घालणाऱ्या या श्रावणबाळाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

    follow whatsapp