फतेहाबाद (हरियाणा): हरियाणातील फतेहाबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या बहाण्याने तब्बल वर्षभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपली वासना शमविण्यासाठी तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर आरोपीने मुलीसोबत लग्नासही नकार दिला.
ADVERTISEMENT
याप्रकरणी आता अल्पवयीन पीडित मुलीने पोलिसांचा दरवाजा ठोठावत न्यायाची याचना केली आहे. आरोपी तरुण हा पटियाला भागातील रहिवासी आहे.
याबाबत माहिती देताना डीएसपी सुभाष चंद्रा यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुण आणि त्याच्या आईविरुद्ध POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे प्रकरण टोहाना परिसरातील गावातील आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तक्रारदार वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी 16 वर्षांची असून तिचे पटियाला येथील लखविंदर नावाच्या मुलांसोबत ओळख होती. 1 सप्टेंबर 2020 पासून तो मुलीवर अत्याचार करत होता. सुरुवातीला लखविंदर आणि त्याची आई हे पीडित मुलीच्य घरी देखील येत होते.
Crime: मामी-भाच्याचे अनैतिक संबंध, भाच्याने केली मामाची निर्घृण हत्या
संमतीविना मुलीसोबत शारीरिक संबंध
याप्रकरणी असा आरोप आहे की लखविंदरने अल्पवयीन मुलीसोबत तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मुलीवर 24 ऑक्टोबर 2021 पर्यंत सातत्याने आरोपी हा बलात्कार करत होता. दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर पटियाला गुरुद्वारा साहिबमध्ये पंचायत बोलावण्यात आली. यावेळी तरुणाने तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेतल लग्नासच नकार दिला. त्यामुळे पीडितेने पोलिसात धाव घेतली. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आता आरोपी लखविंदरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT