तुम्ही इंजेक्शनच्या भीतीमुळे लस घेतली नसेल, तर तुम्हाला इंजेक्शनशिवाय लस घेता येऊ शकेल. हो, हे खरं आहे. कारण राज्यात आता सुई शिवाय घेता येईल अशी लस येणार आहे. राज्यातील जळगाव आणि नाशिकमधून सुरूवात होणार आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्फुटनिक या लसींनंतर आता झायकोव्ह-डी (झायडस कॅडिला) ही तीन डोसची असलेली इंजेक्शन शिवायची लस उपलब्ध होणार आहे.
ADVERTISEMENT
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून नागरिकांचं लसीकरण करण्याचा वारंवार सल्ला दिला जात आहे. केंद्राबरोबरच राज्यांनीही लसीकरण कार्यक्रमाला वेग दिला जात आहे. तर दुसरीकडे अनेक नागरिक लस घेण्यास वा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम राबवले जात आहे. त्यातच आता सुई शिवाय लसीकरण करता येईल अशी लस उपलब्ध येणार असून, जळगाव-नाशिक जिल्ह्यातून सुरू होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्फुटनिक या लसींनंतर आता झायकोव्ह-डी ही तीन डोस असलेली इंजेक्शन फ्री लस उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्यात प्राथमिक टप्प्यात केवळ नाशिक व जळगाव या दोनच जिल्ह्याची निवड झाली आहे.
अनेकांना इंजेक्शची भीती वाटत असल्याने ही इंजेक्शन फ्री अशी लस आणण्यात येत आहे. या लसीचे तीन डोस २८ दिवसांच्या अंतराने घ्यावे लागणार आहे. ज्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, अशा 18 वर्षांपुढील नागरिकांना या लसीचे डोस दिले जाणार आहेत.
लस कशी दिली जाणार?
ही सुईशिवायची लस देताना केवळ मशिन त्वचेवर ठेवल्यानंतर औषध त्वचेच्या वरच्या थरामध्ये जाणार जाते. ही लस कशी द्यावी यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पुढच्या आठवड्यात ही लस प्रत्यक्षात दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
ADVERTISEMENT