Ajit Pawar vs Nitesh Rane : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे आणि संजय गायकवाड यांच्या भूमिकेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. बुलढाण्यातील कार्यक्रमात अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीतील वाचाळ नेत्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता अजित पवारांचे निकटवर्तीय नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून नितेश राणेंची तक्रार केलीय. परिणामी आता अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी सुरू केलीय का? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी थेट आपली नाराजी व्यक्त केली असून, युतीतील काही नेत्यांच्या वागणुकीवरही ताशेरे ओढले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निश्चितच महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार युतीत राहतात की बाहेर पडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.