अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना दिलेल्या उमेदवारीच्या प्रश्नावरुन चांगलेच भडकले. मी माझं मत व्यक्त केलं. तुम्ही माझ्या वक्तव्याची एवढी चिरफाड कशाला करता? मी माझं मत व्यक्त केलं तर तुम्ही पंचनामा केला म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. मी सध्या दौऱ्यावर आहे. सुप्रिया सुळे भेटल्या तर राखी बांधून घेईन असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना त्यांच्या मताबद्दल ठाम असणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांना इतरांचा विरोध सहन करावा लागतो.