सचिन वाझे प्रकरणानंतर नुकताच महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यांच्या जागेवर पोलिस आयुक्त म्हणून महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच आणखीही काही जणांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सरकारमधून डच्चू मिळणार का? याबद्दल मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. या भेटीत गृहमंत्री शरद पवारांना या प्रकरणाविषयी त्यांची बाजू काय सांगतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत, शरद पवारांशी घेणार भेट
मुंबई तक
19 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)
सचिन वाझे प्रकरणानंतर नुकताच महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यांच्या जागेवर पोलिस आयुक्त म्हणून महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच आणखीही काही जणांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सरकारमधून डच्चू मिळणार का? याबद्दल मात्र उलटसुलट चर्चा […]
ADVERTISEMENT