Maratha Reservation: लातूर: लातूर येथील अहमदपूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. ताफा अडवल्यानंतर त्यांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या. तसेच काही आंदोलकांनी शिवीगाळ केली असल्याचं आता समोर आलं आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावं अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे. जी पूर्ण न झाल्याने आंदोलक हे सातत्याने राजकीय नेत्यांना धारेवर धरत आहेत. तशाच पद्धतीने काल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच ताफा अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (cm eknath shinde convoy stopped by maratha protestors led by manoj jarange in latur)
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील परळी येथे नियोजित राज्यस्तरीय कृषी मेळावा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईकडे परत येत असताना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. यावेळी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते.
ADVERTISEMENT