उद्धव ठाकरे यांचा फुल टॉस : औरंगाबादेत भाजप नेत्यांकडे बघून म्हणाले भावी सहकारी

मुंबई तक

17 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी […]

follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा भावी सहकारी असा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

हे वाचलं का?

औरंगाबादेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असं उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवेंकडे बघून म्हटलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला युतीसाठी इशारा तर केला नाही ना’, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणादरम्यान? पाहा हा व्हीडिओ

    follow whatsapp