Maratha Reservation Impact In Beed: बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना अंतर्गत गोंधळ समोर आला. शरद पवार गटाच्या महिला नेत्या हेमा पिंपळे या शिष्टमंडळात सहभागी झाल्या. मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर करताच ही शाब्दिक चकमक दिसून आली. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळातील काही सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. हेमा पिंपळे यांनी त्यांच्या पक्षाच्या भूमिकेनुसार बोलताना मराठा आंदोलकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हा वाद वाढतच जाण्याची शक्यता आहे, म्हणून सर्वांची नजर आता पुढील घडामोडींवर आहे.