देशी गाईंना राज्यमाता गोमाता दर्जा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई तक

30 Sep 2024 (अपडेटेड: 30 Sep 2024, 07:09 PM)

राज्यातील देशी गाईंना राज्यमाता गोमाता असा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारने सोमवारी हा निर्णय घेतला असून भारतीय संस्कृतीत गायीचे असाधारण महत्व आहे.

follow google news

राज्यातील देशी गाईंना राज्यमाता गोमाता असा दर्जा देण्यात आला आहे, असा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. भारतीय संस्कृतीत गायीचे अनन्यसाधारण महत्व आहे आणि या निर्णयामुळे त्या गाईंना विशेष संरक्षण व सन्मान मिळेल. गाईंना राज्यमाता- गोमाता दर्जा देण्यात आल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानले. या निर्णयाने राज्यातील देशी गाईंच्या संवर्धनास मदत होईल, असेही ते म्हणाले.

हे वाचलं का?
    follow whatsapp