Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा

मुंबई तक

11 Jan 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

माजी गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (anil Deshmukh) तुरूंगातून बाहेर येत नाही, तोच राष्ट्रवादीच्या आणखी एक बड्या नेता ईडीच्या रडारवर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरुद्ध ईडीने (ED) कारवाई सुरू केली असून, आज सकाळी 25 जणांच्या ईडीच्या पथकाने (ED team) हसन मुश्रीफाच्या घरावर (Hasan Mushrif House) छापा टाकला आहे. छापेमारीची […]

follow google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप केलेले आहेत. ‘हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्याद्वारे मनी लाँड्रिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे माझ्याकडे पुरावे असल्याचंही सोमय्यांनी आरोप करताना सुरूवातीला म्हटलं होतं.

हे वाचलं का?

Kirit Somaiya Vs Hasan Mushrif : मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप. पण मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय?

किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी 2700 पानी पुरावे ईडी आणि आयकर विभागाला दिले होते. हसन मुश्रीफानी 127 कोटींचं मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप सोमय्यांचा आहे. तेव्हापासूनच हसन मुश्रीफ यांच्यामागे आयकर विभाग आणि ईडीचा ससेमिरा लागला होता. दरम्यान, बुधवारी (11 जानेवारी) सकाळी ईडीचं 25 जणांचं पथक हसन मुश्रीफ यांच्या कागल शहरातील घरी दाखल झालं.

“ईडी, सीबीआयने किरीट सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का?”

हसन मुश्रीफ यांचं कागल शहरातील मुजावर गल्ली परिसरात घर आहे. याच घरी ईडीचं पथक सकाळी दाखल झालं असून, झाडाझडती सुरू आहे. ईडीचा छापा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमा झाले आहेत. ईडीच्या कारवाईविरुद्ध घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे.

    follow whatsapp