Harshwardhan Patil Latest News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील इंदापुरात नुकतीच जनसन्मान यात्रा घेतली. यावेळी त्यांनी दत्ता भरणे यांनी तालुक्यात केलेल्या कामांचा उल्लेख केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीकडून दत्ता भरणे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळं यावरून भाजपचे इच्छूक उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणी वाढल्यात. नेमके हर्षवर्धन पाटील भाजपमध्येच राहणार की भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात धरणार हे जाणून घेऊया हर्षवर्धन पाटील यांच्याकडून. अजित पवार यांची महायुतीत एंट्री भाजपला 40 जागांवर फटका देऊ शकते, पाटील यांनी स्पष्ट केले.