हिंगोली शहर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार उडवला आहे. पुराच्या पाण्यात अनेक वाहनं बुडाली असून घरांमध्ये पाणी शिरलंय. बांगर नगर आणि अनेक भागांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. हवामान विभागानं हिंगोलीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हिंगोलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु असून प्रशासनाकडून बचावकार्यही सुरु आहे. अशा परिस्थितीत नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. पावसाचा जोर कमी व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे, पण हवामान विभागाच्या अन्दाज़ानुसार पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.