नवा ट्विस्ट, नवाब मलिकांनी शेअर केले ‘ते’ व्हिडिओ

मुंबई तक

07 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:36 PM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दोन नवे व्हिडिओ शेअर केलेत. मनिष भानुशाली आणि के. पी. गोसावी हे अरबाज मर्चंट आणि आर्यन खानला एनसीबी कार्यालयात नेताना अधिकाऱ्यांसोबत दिसले होते. त्यानंतर ते त्याच रात्री म्हणजे 2 ऑक्टोबरला पावणेबाराच्या सुमारास पुन्हा एनसीबी कार्यालयात जाताना दिसतात. मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांच्या […]

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी दोन नवे व्हिडिओ शेअर केलेत. मनिष भानुशाली आणि के. पी. गोसावी हे अरबाज मर्चंट आणि आर्यन खानला एनसीबी कार्यालयात नेताना अधिकाऱ्यांसोबत दिसले होते. त्यानंतर ते त्याच रात्री म्हणजे 2 ऑक्टोबरला पावणेबाराच्या सुमारास पुन्हा एनसीबी कार्यालयात जाताना दिसतात. मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांच्या एनसीबी कार्यालयातील खुलेआम वावरावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भानुशाली याचे भाजपमधील बड्या नेत्यांसोबत फोटो आहेत. तर के. पी. गोसावी आपण खासगी गुप्तहेर असल्याचं सांगतो.

हे वाचलं का?
    follow whatsapp