Udhhav Thackeray News : भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता दिसून येत आहे. शिवसेनेच्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचं काम करण्यास नकार दिला आहे. कार्यकर्त्यांनी ठराव पास केला की, भोसरीची जागा शिवसेनेलाच सुटली पाहिजे आणि तुतारीचं काम त्यांनी स्वीकारू नये.
ADVERTISEMENT
ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उभाळे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे की, कार्यकर्त्यांचा विरोध स्पष्ट आहे आणि त्यांनी तुतारीचं काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाकरेंच्या गटाने हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाने आगामी निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.
ADVERTISEMENT