अहमदाबादमध्ये पुनर्निर्माण करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या ‘मोटेरा क्रिकेट स्टेडियम’चं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी, सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव काढून स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केली. त्यानंतर आता विरोधकांकडून यानिर्णयावर टीका होताना दिसतीये.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदींवर टीका करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना थेट जर्मनीचा हुकूमशाह हिटलरशी केलीय. ‘हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते’, अशा शब्दांत त्यांनी टीका केलीय.
ADVERTISEMENT