mumbaitak
कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींना असं काय म्हटलं की चर्चा सुरु झाली
मुंबई तक
27 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:25 PM)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दांबद्दल कालीचरण महाराज आता चांगलेच चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमध्ये महात्मा गांधींना कालीचरण यांनी शिव्यांची लाखोली वाहिल्याचं दिसतय. एका बाजूला महात्मा गांधी यांना शिव्या दिल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला नथूराम गोडसेचे आभारही कालीचरण यांच्याकडून मानले जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतय.
ADVERTISEMENT