लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात जमा, लाभार्थीला अश्रू अनावर

मुंबई तक

15 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 06:38 PM)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे वरळीतल्या पहिल्या लाभार्थी लता पाटील यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

follow google news

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे खरंच खात्यात जमा होतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. महाराष्ट्रातील वरळीमध्ये या योजनेचे पैसे मिळालेल्या पहिल्या लाभार्थी लता पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. ३००० रुपये खात्यात जमा झाल्यानं या लाडक्या बहिणीला अश्रू अनावर झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेअंतर्गत गरजू मुलींना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लता पाटील या योजनेतील पहिल्या लाभार्थी आहेत, ज्यांना या योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळाला आहे. त्यांच्या या प्रसंगावार त्यांना झालेल्या आनंदाचा कोणताही थांग लागणार नाही. महाराष्ट्रातील इतर गरजू मुलींना देखील या योजनेचा लाभ होईल हीच आशा आहे. महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमामुळे अनेक मुलींचे आयुष्य बदलणार आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp