लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आता मात्र वेगळ्याच कारणामुळे ही योजना चर्चेत आलीय. काही बहीणींच्या खात्यात पैसे आले खरे पण ते काही वेळातच बॅंकेकडून पुन्हा काढून घेण्यात आले. रक्षाबंधनाच्या आधी सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा करण्यात आले होते. पण हेच ३००० रुपये काही महिलांच्या बॅकेंतून डेबिट करण्यात आल्यानं आता लाडक्या बहिणींकडून संताप व्यक्त होतोय. शासकीय योजना असूनही अशा प्रकारचे गैरप्रकार होत असल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारकडून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे. योजनेचा तपशीलवार अभ्यास करून नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी आहे. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे कसे गायब झाले याची चौकशी सुरु आहे. महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जाऊ नये यावर भर देणे आवश्यक आहे.