Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांवर शांतता रॅलीवर दगडफेकीच्या कटाचा आरोप केलाय. भाजप नेते मराठा समाजाच्या विरोधात बोलतात असा आरोपही त्यांनी केलाय. काकांना कुणी मोठं केलं म्हणत मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय.
ADVERTISEMENT
सोलापुरात बुधवारी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची शांतता रॅली पार पडली. या रॅलीला मराठा बांधव प्रचंड सख्येंने हजर होते. संपूर्ण राज्यात मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली सुरु आहेत. सांगलीतील रॅलीआधी जरांगे पाटलांनी हा आरोप केलाय.
ADVERTISEMENT