मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, अंतरवाली सराटीच्या महिलांनी व्यक्त केला निषेध

मुंबई तक

21 Sep 2024 (अपडेटेड: 21 Sep 2024, 08:43 AM)

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस. डॉक्टरांच्या तपासणी अहवालानंतर महिलांनी व्यक्त केला निषेध.

follow google news

Manoj Jarange Strike Latest News: मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. डॉक्टरांच्या पथकाने जरांगे यांची नुकतीच तपासणी केली. जरांगे यांच्या शुगरचे प्रमाण 83 असल्याचे डॉक्टरांच्या अहवालातून समोर आलं. यामुळे ते चिडून गेले आणि त्यांनी डॉक्टरांना फडणवीस सरकारसाठी काम करताय का? असा आरोप केला. तसेच, जरांगे यांनी डॉक्टरांना विचारले की, माझी शुगर आधी 70 होती तर आता ती 83 कशी झाली. यामुळे त्यांची तब्येत अधिकच खालावली आहे. अंतरवाली सराटीतील महिलांनी या घटनेबद्दल रोष व्यक्त केला आणि जोरदार निषेध केला.

follow whatsapp