मुंबई: कोरोनाचा महाराष्ट्रातला वाढता कहर थांबताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रूग्ण हे १० ते १२ हजारांच्या घरात वाढत होते. मंगळवारी ही संख्या १७ हजारांवर गेली होती. तर बुधवारी दिवसभरात आता २३ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात ९ हजार १३८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. वाढती रूग्णसंख्या हा महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरतो आहे. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीसी द्वारे संवाद साधला. यामध्येही त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या रूग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
टॉप 5 हेडलाईन्स
1. राज्यात कोरोनाचा उद्रेक, 17 सप्टेंबरनंतरचे सर्वाधिक रुग्ण
2. 45 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
3. नारायण राणेंनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीमान्याची मागणी
4. हे ठाकरे सरकारचं पाप, शेलारांची टीका, तर कंगनाचाही ठाकरे सरकारवर हल्ला
5. हाफकिनकडून लस उत्पादनाचे प्रयत्न
ADVERTISEMENT