राणे पितापुत्रांना दिशा सालियान प्रकरणात मोठा झटका, पोलिसांनी बजावलं समन्स

मुंबई तक

02 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू होणार असल्याचं दिसतं आहे. दिशाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी नारायण राणेंसह नितेश राणेंनाही समन्स बजावलं आहे. दिशा सालियनची बलात्कार हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला […]

follow google news

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू होणार असल्याचं दिसतं आहे. दिशाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी नारायण राणेंसह नितेश राणेंनाही समन्स बजावलं आहे. दिशा सालियनची बलात्कार हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता नारायण राणेंसह नितेश राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नितेश राणे यांना आज (३ मार्च) सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp