Ramgiri Maharaj vs Nitesh Rane : महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामगिरी महाराजांच्या विरोधात निघालेल्या मोर्चात देण्यात आलेल्या घोषणांवर राणेंनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नितेश राणे यांनी आपल्या विधानांमधून स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या घोषणांनी समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण होतो. रामगिरी महाराज यांचे वक्तव्य आणि त्यावर आलेली प्रतिक्रिया यामुळं राजकीय वर्तुळात अनेकांचे मतभेद समोर येत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील वातावरण पुन्हा तापलं आहे.