किरीट सोमय्या ‘जरंडेश्वर’ बघायला गेले आणि राडा झाला…| Ajit Pawar

मुंबई तक

06 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:36 PM)

सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आल्यानंतर एनसीपी कार्यकर्ते व कारखाना शेतकरी सभासदांनी त्यांना घेराव घातला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिम्मत असेल तर कारखान्याचे मालक कोण? हे जाहीर करावे, असे आव्हान सोमय्या यांनी दिले. बुधवारी सकाळी पाऊने दहा वाजता जरंडेश्वर कारखान्यावर सोमय्या भाजप कार्यकर्त्यांसोबत […]

follow google news

सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आल्यानंतर एनसीपी कार्यकर्ते व कारखाना शेतकरी सभासदांनी त्यांना घेराव घातला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिम्मत असेल तर कारखान्याचे मालक कोण? हे जाहीर करावे, असे आव्हान सोमय्या यांनी दिले. बुधवारी सकाळी पाऊने दहा वाजता जरंडेश्वर कारखान्यावर सोमय्या भाजप कार्यकर्त्यांसोबत पोहचले. यावेळी कारखान्यावर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सुरुवातीला जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्या बाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.

हे वाचलं का?
    follow whatsapp